Banastarim Bridge Accident प्रकरणी महत्वाची बातमी! वाहतूक खात्याची मेघनाला नोटीस, तर पती परेश सावर्डेकरचाही परवाना रद्द होणार

वेगमर्यादेचे उल्लंघन अंगलट : सध्या परेश पोलिस कोठडीत असल्याने नोटीस बजावता आलेली नाही
Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident बाणस्तारी अपघातापूर्वी सात वेळा वेगमर्यादेचे उल्लंघन करून दंडात्मक कारवाईकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने मेघना सावर्डेकर हिला तिचा वाहन चालवण्याचा परवाना का मागे घेतला जाऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावली आहे.

तसेच बाणस्तारी अपघाताला कारणीभूत चालक, तिचा पती परेश सावर्डेकर याला त्याचा वाहन चालवण्याचा परवाना मागे का घेऊ नये, अशी नोटीस बजावण्यात येणार आहे. सध्या तो पोलिस कोठडीत असल्याने त्याला नोटीस बजावता आलेली नाही, असे वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत राज्यात २२ हजार १६१ जणांचे वाहन चालवण्याचे परवाने निलंबित केले आहेत, असेही सातार्डेकर म्हणाले. बाणस्तारी अपघातप्रकरणी कारवाईविषयी ते म्हणाले की, सावर्डेकर दाम्पत्याचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे.

3232 परवाने रद्द

मद्य वा अमली पदार्थांच्या अमलाखाली वाहन चालवल्याप्रकऱणी गेल्या पाच वर्षांत ३ हजार २३२ जणांवर वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली असल्याची माहिती वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी दिली.

जखमींना मिळणार अपघाती लाभ; मुख्यमंत्री

बाणस्तारी अपघातातील जखमींवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून तिघांचीही प्रकृती सुधारत आहे. या जखमींना सरकारमार्फत अपघातग्रस्तांना दिले जाणारे लाभ दिले जातील. तसेच मृतांच्या नातेवाईकांनाही आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी मिरामार येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली

Banastarim Bridge Accident
Colvale Crime News : महिला पोलिसाला शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल; कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल

रुग्णालयात विचारपूस

बाणस्तारी पुलावर गेल्या रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मद्यधुंद मर्सिडीस बेंझ चालकाने तिघांना चिरडले होते, यात तिघे गंभीर जखमी झाले होते. या जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करून जखमींची विचारपूस केली होती.

जखमींची प्रकृती स्थिर; लवकरच मिळणार डिस्चार्ज

बाणावली येथील भीषण अपघातात ६६ वर्षीय शंकर हळर्णकर यांच्या मणक्याला इजा झाली असून त्यांचा एक हात आणि पाय निकामी झाला आहे. २१ वर्षीय वनिता भंडारी यांना अनेक जखमा झाल्या आहेत.

त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी विभागात उपचार सुरू आहेत, तर राज माजगावकर यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे. यासंदर्भात आज पत्रकारांनी विचारले असता, आपण रुग्णालयात जाऊन तिन्ही रुग्णांची भेट घेतली. तिघांची प्रकृती सुधारत आहे.

Banastarim Bridge Accident
Old Goa : बेपत्ता अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात ओल्ड गोवा पोलिसांना यश

त्यातील एकाला दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल. उर्वरित दोघांना आठ दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात येईल. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर तसेच डॉ. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वाहतूक पोलिस किंवा अधिकारी रस्त्यावर दिसले की वाहनचालक नाराजी व्यक्त करतात. मात्र, वाहनचालक आणि रस्ते वापरणाऱ्या इतर घटकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करावी लागते, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. वाहतूक नियमांचे पालन केले, वेग नियंत्रणात ठेवला तर कोणावरही कारवाई होणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

- राजन सातार्डेकर, संचालक, वाहतूक खाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com