VIDEO: “एका XXसाठी 7,000 रूपये” पर्यटनाच्या नावाखाली गोव्यात देहविक्रीचा बाजार? रशियन तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

Goa Russian Giral Viral Video: निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला.
Russian Woman Prostitution Row Goa
Goa Russian Giral Viral Video:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Russian Giral Viral Video: निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. गोव्यातील सर्वात गजबजलेला भाग समजल्या जाणाऱ्या 'बागा बीच' परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक रशियन तरुणी भररस्त्यात उभी राहून पर्यटकांशी देहविक्रीसाठी उघडपणे सौदेबाजी करताना दिसत आहे. या प्रकारामुळे गोव्यातील पर्यटन संस्कृतीवर आणि इथल्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राज्याच्या प्रतिमेला मोठा तडा गेला.

गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करत या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध केला. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, संबंधित विदेशी महिला रस्त्याच्या कडेला उभी राहून येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांशी निर्लज्जपणे बोलत आहे. इतकेच नाही तर, ती ग्राहकांशी दराबाबत (Rate) घासाघीस करतानाही ऐकू येत आहे. या संभाषणात 7000 ते 8500 रुपयांपर्यंतचे सौदे ठरवले जात असून हॉटेलचा खर्च आणि स्वतःच्या 'सर्व्हिस'बद्दल ती महिला कोणत्याही भीतीशिवाय बोलताना दिसते.

Russian Woman Prostitution Row Goa
Goa Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा भेदला, मॅजिस्ट्रेटचे खोटे सोंग उघड; साताऱ्यात संशयित जेरबंद

विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार एखाद्या बंद खोलीत किंवा निर्जनस्थळी घडत नसून बागाच्या मुख्य रस्त्यावर घडत आहे, जिथून सतत पोलीस गाड्या आणि शेकडो पर्यटक ये-जा करत असतात.

Russian Woman Prostitution Row Goa
Goa Crime: म्हापसा टॅक्सी स्टँडवर पर्यटकांची गुंडगिरी! किरकोळ कारणावरून स्थानिकाला शिविगाळ करत मारहाण, कर्नाटकचे 7 जण ताब्यात

या व्हिडिओनंतर सावंत सरकार विरोधकांच्या आणि जनतेच्या निशाण्यावर आले. सोशल मीडिया युजर्संनी गोवा पोलीस (Goa Police) आणि राज्य सरकारला टॅग करत तीव्र संताप व्यक्त केला. गोव्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे. जर अशाप्रकारे रस्त्यावर अनैतिक कामे आणि गुन्हेगारी उघडपणे सुरु राहिली, तर सुसंस्कृत आणि विदेशी पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बागा बीचसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी जर असे प्रकार घडत असतील, तर महिला पर्यटकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Russian Woman Prostitution Row Goa
Goa Crime: डिचोलीतील 'सेतू संगम'च्या सुरक्षेत त्रुटी, संशयास्पद मृतदेह सापडल्याने खळबळ

नेटकऱ्यांनी गोव्याच्या (Goa) पोलीस महासंचालकांकडे (DGP) या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित महिलेवर आणि या रॅकेटमध्ये सामील असलेल्या दलालांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दुसरीकडे, आमदार सरदेसाई यांनी हा मुद्दा लावून धरला असून 'हाच का तुमचा प्रगत गोवा?' असा संतप्त सवाल सरकारला विचारला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण असून गोव्याच्या संस्कृतीचे जतन करण्याऐवजी अशा विकृतींना राजाश्रय मिळत असल्याची टीका होत आहे. आता या धक्कादायक प्रकारानंतर गोवा प्रशासन नेमकी काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com