Govind Gaude: 'तवडकर-गावडेंतील वाद अंतर्गत, याकामी मुख्यमंत्री लक्ष घालतील'; वादावर पडदा टाकण्याचा तानावडेंचा प्रयत्न

Goavind Gaude: 'तानावडेंचे असे बोलणे चुकीचे आणि हास्यास्पद'- गोवा फॉरवर्ड
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak

Goavind Gaude: काल म्हणजेच 02 फेब्रुवारीला विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपताच विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी थेट कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर शरसंधान केले.

खोतिगाव पंचायत क्षेत्रात न झालेल्या कार्यक्रमांसाठी 26 लाख 85 हजार रुपयांचे विशेष अनुदान कला व संस्कृती खात्याने दिले आहे त्याची चौकशी करावी, असे सभापतींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सांगितले आहे.

सभापतींनी केलेल्या आरोपानंतर भाजपसह गोव्यातील राजकारणात एकच चर्चा रंगली. विरोधी पक्षाने भाजपचा भ्रष्ट कारभार समोर आल्याची टीका केली तर गोवा फॉरवर्डने गावंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी मात्र या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

आज 03 फेब्रुवारीला मीडियासमोर बोलताना राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी , ''हा त्यांच्यातला अंतर्गत वाद आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा वाद सोडवला जाईल'', असे म्हणत हे प्रकरण शमवण्याचा प्रयत्न केला.

मात्र गोवा फॉरवर्डने तानावडेंच्या या स्पष्टीकरणावर प्रतिप्रश्न उपस्थित केलाय. सभापतीसारख्या व्यक्तीने मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणे हा भाजपचा अंतर्गत मामला होऊ शकत नाही प्रदेशाध्यक्षांनी असे म्हणणे हे चुकीचे आणि हास्यास्पद असल्याचे गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Govind Gaude
Yuri Alemao: काणकोणकरांप्रती दया दाखवून काणकोण वाचवा! असं का म्हणताहेत युरी आलेमाव?

काणकोण मतदारसंघातील 13 संस्थांना एकूण 26 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. हा निधी मिळालेल्या संस्थांनी कोणताही कार्यक्रम केलेला नाही.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचा यात हात असल्याचा आरोप खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, पंच जयेश गावकर यांच्यासह अन्य पंचांनी केला होता.

याच मुद्द्याला धरून सभापती तवडकर यांनी मंत्री गावडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला मंत्री गावडे यांनीही प्रसार माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

याच विषयावर बोलताना खासदार तानावडे यांनी हा वाद अंतर्गत आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर हा वाद मिटवू, असे स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com