Goa Assembly Session: विधानसभेत TCP सुधारणा विधेयकावरून गोंधळ; आमदार वेंझींना उचलून सभागृह बाहेर नेले

Goa Assembly Session: अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी TCP दुरुस्ती विधेयक मुद्दा बराच गाजला
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak

Goa Assembly Session: अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला बुधवारी सुरुवात झाली. दुपारपर्यंत विधानसभेत बऱ्याच घडामोडी घडल्या असून गोविंद गावडे, पर्यटन नेहरू स्टेडियम या प्रमाणेच TCP दुरुस्ती विधेयक मुद्दा बराच गाजला.

TCP मिनिस्टर विश्वजित राणे यांनी विधेयकावर बोलण्यास सुरुवात केली. राज्यातील जमीन विकास आणि इमारत बांधकाम नियमनाअंतर्गत केलेल्या नव्या दुरुस्त्यांना विरोधी बाकावरच्या आमदारांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली.

नवे बदल रद्द करावेत या मागणीसाठी बुधवारी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ पाहायला मिळाला.

काजूचे पीक घेणाऱ्या जमिनीवर सुद्धा बिल्डर लॉबी बांधकाम सुरु ठेवत असून 39 A दुरुस्ती ही गोवा संपवण्याचा प्रयत्न करणारी असल्याचे विरेश बोरकर यांनी सांगितले.

आमदार, पंचायती आपल्याला हव्या त्या जागेवर बांधकाम सुरु करत आहे. यावर मतदान घ्या असे सांगत विरेश बोरकर आणि युरी आलेमाव यांनी मुद्दा लावून धरला.

दुरुस्ती विधेयकासाठी मतदानाची मागणी पुरी होत नाही हे समजताच विरोधी पक्षनेते युरी, आमदार वीरेश बोरकर यांनी वेलमध्ये प्रवेश करत सभागृहात गोंधळ निर्माण केला.

Goa Assembly Session
Goa Farming: बांबरमध्ये डोलते पारंपरिक भातशेती

मात्र त्यांची मागणी डावलून सभापतींनी बिल पास असे सांगितल्यावर या विधेयकाच्या मतदानासाठी विरोधी आमदार वीरेश बोरकर, युरी आलेमाव, वेंझी व्हिएगस, कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्ता वेलमध्ये गेले आणि मतदानाची मागणी लावून धरली.

दरम्यान या गोंधळात वीरेश आणि वेंझी वेलमध्येच खाली बसले. त्यामुळे सभागृहातील मार्शलांनी आमदार वेंझी यांनी उचलून सभागृह बाहेर गेले.

TCP विभागाच्या परवानगीशिवाय बांधलेले कोणतेही घर बेकायदेशीर असून गोव्यात ग्रामपंचायत क्षेत्रात बांधलेली बहुतांश घरे ही कोणत्याही परवानगीशिवाय बांधली गेली असल्याचे आहेत. गोव्यातील सर्व गावांमध्ये पडताळणी करावी अशी मागणी काही काळापूर्वी गोव्यातील काही नागरिकांनी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com