Goa Assembly Monsoon Session 2023 : आयआयटीचा विषय मार्गी लावा; आमदार दिगंबर कामत

दिगंबर कामत : जागा निश्‍चितीवर सरकारने आता गांभीर्याने विचार करावा
दिगंबर कामत
दिगंबर कामतDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी भरीव वाढ केलेली आहे. एका बाजूला गोवा ‘एज्युकेशन हब’ होईल असे सांगितले जाते आणि दुसऱ्या बाजूला अजूनही आयआयटीसाठी जागा निश्‍चित होत नाही. याबाबत विचार होणे आवश्‍यक आहे. आयआयटीसाठी जागा निश्‍चित करून तो विषय निकाली काढावा, अशी सूचना आमदार दिगंबर कामत यांनी मांडली.

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पावरील चर्चेत कामत यांनी मत मांडले. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर २५ टक्के निधी दिलेला आहे. त्याशिवाय आरोग्याच्या निधीमध्ये १७ टक्क्यांनी वाढ केलेली आहे. शिक्षण खात्याला दिलेल्या निधीत भरीव वाढ केलेली आहे. राज्यात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एऩआयटी) उभारली गेली.

दिगंबर कामत
Panjim News : नार्वे फेरी धक्क्याची दुरुस्ती रखडली

परंतु आयआयटीचा प्रश्‍न अजूनही लोंबकळत राहिला आहे, असे कामत म्‍हणाले.सांगे की काणकोण जागेचा शोध सुरू आहे. सांगेतील जागा निश्‍चितीनंतर त्याचा नकाशा इंटरनेटवरून सर्वत्र पोहोचला होता. त्यामुळे आयआयटीसाठीची जागा निश्‍चित करून तो प्रश्‍न त्वरित सोडविला जाणे आवश्‍यक आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

दिगंबर कामत
Panjim News - सांतीनेज रस्त्याची दुरवस्था; प्रवाशांचा जीव धोक्यात | Gomantak Tv

गोमेकॉत कर्करोग निदान केंद्र ही मोठी उपलब्‍धी

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) कर्करोगावर निदान करणारे केंद्र सुरू झाले ही एक मोठी उपलब्धता आहे. परंतु आरोग्य सेवांमध्ये सुरू असलेली दीनदयाळ स्वास्‍थ्‍य सेवा योजनेद्वारे (डीडीएसएसवाय) बाह्यरुग्णालयांत दिली जाणारी बिले थकली जाऊ नयेत, अशी सूचना कामत यांनी केली. त्याचबरोबर मोतीडोंगर परिसरात आयुष हॉस्पिटलची उभारणी होत असल्याने मडगावातील नागरिकांना त्याचा निश्‍चित फायदा होणार आहे, असे दिगंबर कामत म्‍हणाले. राज्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावला आहे, असेही कामत यांनी यावेळी सांगितले.

दिगंबर कामत
Panjim News : नेवगीनगर-ताळगाव रस्‍त्‍यावरील धोकादायक खड्डे अखेर बुजवले

‘कोडिंग-रोबोटिक'चा फायदा

अनेक महाविद्यालयांमध्ये २००-३०० जागा आरक्षित राहत असल्याचे सांगत सरकारने सुरू केलेल्या ‘कोडिंग ॲण्ड रोबोटिक’ अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे, असे कामत म्‍हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व आमदारांना वार्षिक अडीच कोटी रुपये विकास निधी मंजूर केल्याने त्याचा निश्‍चित फायदा होणार आहे. शिवाय जी-२० सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बैठका येथे होत असल्याने तीही राज्यासाठी जमेची बाजू आहे, असे कामत म्‍हणाले.

जागेचा प्रश्‍‍न तातडीने निकाली काढा

राज्यात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) उभारली गेली. परंतु आयआयटीचा प्रश्‍न अजूनही लोंबकळत राहिला आहे, असे कामत म्‍हणाले. अजून जागेचा प्रश्‍‍न मिटलेला नाही. राज्‍य सरकारने या प्रश्‍‍नाकडे आता गांभीर्याने पाहून लवकरात लवकर आयआयटीसाठी जागा निवडावी. त्‍यामुळे हा प्रश्‍‍न मार्गी लागून गोवा आणखी एक पाऊल ‘एज्‍युकेश हब’च्‍या दिशेने टाकेल, असे दिगंबर कामत यांनी सांगितले. कारण शैक्षणिकदृष्‍ट्या ते खूप महत्त्‍वाचे आहे, असेही कामत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com