तिसरा जिल्हा करण्यासाठी म्हणून भाजपात गेल्याचा रवींचा दावा होता. भाजपात जाऊन मंत्री होऊन आता रवींचे मंत्रीपद जायचे झाले. तिसरा जिल्हा कुठे आहे? विधानसभेतील महसूली मागण्यांवर गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंचा मंत्री रवी नाईकांना चिमटा
धुळापेर खोर्ली पंचायतीचे पंच गोरखनाथ केरकर, उपसरपंच व पंचायत सचिवासोबत मिळून कचरा विल्हेवाटाच्या नावावर सरकारचे लाखो रूपये गिळंकृत करीत आहे. दुसऱ्यांच्या नावावर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट न लावता तो नदीत टाकतात. आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. यावर महसूल मंत्र्यांनी आजच कारवाई करावी अशी मागणी आमदार राजेश फळदेसाईंनी पुरावे दाखवत सभागृहात केली.
मडगाव मधील ESI रूग्णालयात उत्तम सोयी आहे. पण त्याचा म्हणावा तसा वापर झाला नाही. कोविड काळात या इस्पितळाचा फायदा झाला होता.
त्यामुळे इथे कर्मचारीवर्ग वाढवून ते वापरात आणावे. यामुळे दक्षिण जिल्हा रुग्णालयावरचा भार कमी होईल अशी मागणी दिगंबर कामत यांनी सभागृहात केली.
गोव्यातील गरीब आणि अशिक्षित लोक जे जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कार्यालयात येतात त्यांना ऑनलाईन व्यवस्थेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण उपजिल्हाधिकारी कार्यालयात अशा व्यक्तिंसाठी हेल्प डेस्क ची व्यवस्था करण्याची मागणी दिगंबर कामत यांनी सभागृहात मांडला.
पूजा शर्माशी संबधित आसगाव येथील घराचे म्यूटेशन एका दिवसात झाले तेही रविवारी मग हेच गोमंतकीयांच्या बाबतीत का होऊ शकत नाही, असा सवाल आमदार दिलायला लोबो यांनी उपस्थित केला.
दाबोळी विमानतळाला उत्तरेतील मोपा विमानतळामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेक विमान कंपन्यांनी त्यांचे कामकाज मोपावर स्थलांतरीत केल्याने दाबोळी घोस्ट विमानतळ होणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत विरोधकांनी लक्षवेधी मांडली होती, दरम्यान ती पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
खारफुटी सहसा नदीच्या काठावर असते. परंतू हल्ली ही खारफुटी शेतात येऊ लागल्याने शेतांची खूप नुकसान होत आहे. खारफुटी शेतात येण्यापासून रोखण्यासाठी नवीन धोरण करावे लागेल अशी मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सभागृहात केली.
जमीन हडप एसआयटीची प्रकरणे पुन्हा कोर्टात का पाठवता? एसआयटीकडून जमीन मूळ मालकांना द्या. सभागृहात भाजप आमदार निलेश काब्रालांची सरकारकडे मागणी.
पंढरपूरला जाणाऱ्या २१ ग्रुपला आरोग्यसंबधित तसेच इतर सेवा द्या, विजय सरदेसाई यांची सभागृहात मागणी.
नवीन बोरी पुलासाठी एकही घर पाडले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली. बोरी पुलासाठी 3934 हेक्टर जागेचा वापर होणार आहे. पर्यावरणावर होणारा परिणामांचा विचार केला जाईल. यासाठी ज्यांची जमीन जाईल त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले.
पर्यटनमंत्र्यांच्या ओएसडीच्या परदेश दौऱ्यावर एक कोटी चार लाख रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला होता. याला आक्षेप घेताना आज पर्यटनमंत्री खंवटे यांनी त्यासाठी केवळ सहा लाख ७५ हजार रुपये खर्च झाल्याचा खुलासा केला. कार्लुस यांनी केल्या आरोपांची माहिती सभागृहाला द्यावी किंवा त्यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी खंवटे यांनी सभागृहात केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.