Goa Assembly Monsoon Session 2023: मये मतदारसंघात साडेतीन वर्षात 108रस्ते अपघात

10 जणांचा मृत्यू : रस्त्यावरील अस्पष्ट झेब्रा क्रॉसिंगमुळेही दुर्घटना
Goa Accident Case
Goa Accident CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Case : राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस हे वाढ असताना मये मतदारसंघात गेल्या साडेतीन वर्षात १०८ अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण गंभीर जखमी झाले. या भागात अनेक रस्ता अपघात प्रवण क्षेत्रे आहेत.

त्यासंदर्भात वेळोवेळी रस्ता अपघात झाल्यावर त्याचा आढावा घेतला जातो मात्र, त्या ठिकाणी पुढील पावले उचलली जात नाहीत. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगही गायब झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनाही तेथे असलेले गतिरोधकाचा अंदाज येत नाही व परिणामी अपघात होतात.

मये मतदारसंघातील रस्ते अपघातासंदर्भात स्थानिक आमदार प्रेमेंद्र शेट यांनी प्रश्‍न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना या मतदारसंघातील कुळण - कारापूर तसेच विठ्ठलापूर - कारापूर येथील भाग हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून संबोधित करून त्याच्यावर सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत त्यातील दोष शोधून योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२०२० मध्ये मतदारसंघात ४० अपघात झाले होते, त्यातील ४ अपघातांत चालकाचा मृत्यू झाला होता. तर ५ अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले होते.

८ जण किरकोळ जखमांवर बचावले होते २८ जणांना कोणतीच गंभीर इजा झाली नव्हती. २०२१ मध्ये २९ अपघाताची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ जण गंभीर जखमी झाला होता.

१३ जणांना किरकोळ तर १३ जण सहिसलामत बचावले होते. २०२२ मध्ये २९ रस्ते अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला होता तर ४ जण गंभीर जखमी झाले होते. १३ जणांना किरकोळ मार लागला होता तर ९ जण कोणतीही इजा न होता बचावले होते.

यावर्षी २०२३ मध्ये १० अपघात आतापर्यंत झाले आहेत त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर १ जण गंभीर जखमी झाला. ४ जणांना किरकोळ तर १० जण कोणताही मार लागल्याविना निसटले, अशी लेखी माहिती दिली आहे.

वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांत वाढ

मये मतदारसंघात एकाच ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडल्या नाही, तरी वाहन चालकांकडून नियम उल्लंघनाचे प्रकार वाढले आहेत. २०२० साली मोटार वाहन नियम १८४ खाली २८ जणांविरुद्ध कारवाई झाली आहे तर ६१५ जणांविरुद्ध हेल्मेट न वापरल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई झाली आहे.

२०२१ मध्ये २४ जणांवर कारवाई तर ७४६ वाहन चालक विना हेल्मेट फिरताना पोलिसांनी कारवाई केले आहे. २०२२ मध्ये हेल्मेटची अंमलबजावणी झाल्यापासून प्रमाण कमी झाले व १९३ जणांना २०२२ मध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावर्षी २०२३ मध्ये एकही हेल्मेट न वापरल्याप्रकरणी प्रकरण नोंद झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com