Goa Assembly: आसगाव कोमुनिदादमधील 2.22 लाख चौरस मीटर जमीन हडप; पुरातत्व खात्यातून कागदपत्रे गायब; फेरेरांचा आरोप

MLA Carlos Ferreira: आसगाव कोमुनिदादमधील सुमारे 2.22 लाख चौरस मीटर जमीन बनावट दस्तावेज पुरातत्व खात्यातून गायब करून ती हडप करण्यात आली आहे.
Goa Assembly: आसगाव कोमुनिदादमधील 2.22 लाख चौरस मीटर जमीन हडप; पुरातत्व खात्यातून कागदपत्रे गायब; फेरेरांचा आरोप
MLA Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

आसगाव कोमुनिदादमधील सुमारे 2.22 लाख चौरस मीटर जमीन बनावट दस्तावेज पुरातत्व खात्यातून गायब करून ती हडप करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) चौकशी करण्यासाठी तक्रार दिल्यास त्याची दखल घेतली जात नाही. मामलेदार कार्यालयातून त्याची म्युटेशन प्रक्रिया केली गेली आहे, असा आरोप आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला. पोलिस, सार्वजनिक बांधकाम खाते, कारागृह व इतर खात्यांच्या मागण्यांवरील चर्चेवेळी फेरेरा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत त्याची चौकशी करतो असे आश्‍वासन दिले.

गेल्या कित्येक वर्षापासून गेमिंग कमिशनची नियुक्ती झालेली नाही. पोलिस व अग्निशमन दलाकडे असलेली वाहने जुनी झालेली आहेत, ती बदलण्याची गरज आहे. २३ वर्षांपूर्वीपासून गोवा पोलिस सेवेत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल्सना अजून बढती मिळालेली नाही. पोलिस स्थानकासाठी तसेच पोलिस चौकीसाठी आवश्‍यक साधनसुविधांचा अभाव आहे. पोलिस व ड्रग्ज लागेबांधे हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे हैदराबाद पोलिस व तेलंगणा पोलिसांनी गोव्यातील ड्रग्सविक्रेत्यांना गोव्‍यातून अटक करून नेले. त्यामुळे गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍‍नचिन्‍ह निर्माण होऊन बदनामी झाली आहे, असे फेरेरा यांनी सांगितले.

Goa Assembly: आसगाव कोमुनिदादमधील 2.22 लाख चौरस मीटर जमीन हडप; पुरातत्व खात्यातून कागदपत्रे गायब; फेरेरांचा आरोप
Goa Assembly: 'सरकारचा पर्दाफाश करतोय ते तुम्हाला...'; सरदेसाई-काब्राल-कामत यांच्यात खडाजंगी

पोलिसांकडून न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रांतील तपासकामात अनेक त्रुटी राहत असल्याने संशयित निर्दोष सुटत आहेत. शिक्षा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यास सरकारी वकील जबाबदार नसून पोलिसांनी केलेल्या तपासात ठेवलेल्या चुका व त्रुटी कारणीभूत ठरत आहेत, याकडे फेरेरा यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com