Goa Assembly: 'सरकारचा पर्दाफाश करतोय ते तुम्हाला...'; सरदेसाई-काब्राल-कामत यांच्यात खडाजंगी

Vijay Sardesai: आमदार सरदेसाई साडेचार वाजल्यापासून आपली बाजू मांडत होते. होमगार्डच्या विषयावर ते बोलत होते.
Goa Assembly: 'सरकारचा पर्दाफाश करतोय ते तुम्हाला...'; सरदेसाई-काब्राल-कामत यांच्यात खडाजंगी
Goa assembly monsoon session 2024 Dainik Gomantak
Published on
Updated on

विरोधी आमदार विजय सरदेसाई हे गृहखाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर आपल्‍या मागण्या आणि सूचना मांडत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार नीलेश काब्राल यांनी आक्षेप घेत सरदेसाई हे वेळेपेक्षा जास्त बोलत असल्याचे सांगितले. त्‍यामुळे सरदेसाई खवळले. ‘सरकारला उघडे पाडत तुम्हाला ते नको आहे’ असे ते तावातावाने म्‍हणाले. त्यातच आमदार दिगंबर कामत यांनी तोंड घातल्याने सरदेसाई यांनी त्‍यांनाही खडे बोल सुनावले.

आमदार सरदेसाई साडेचार वाजल्यापासून आपली बाजू मांडत होते. होमगार्डच्या विषयावर ते बोलत होते. तेवढ्यात आमदार काब्राल यांनी ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’ असे म्‍हणून आक्षेप नोंदविला. त्‍यामुळे या दोघांमध्‍ये शाब्दिक चकमक उडाली. त्‍यातच दिगंबर कामत यांनी उभे राहून ‘‘विधानसभा कामकाज समितीने (बीसीए) विरोधी सदस्याला किती वेळ द्यायचा हे ठरविले आहे, त्यानुसार त्यांनी बोलले पाहिजे’’ असे सांगितले.

Goa Assembly: 'सरकारचा पर्दाफाश करतोय ते तुम्हाला...'; सरदेसाई-काब्राल-कामत यांच्यात खडाजंगी
Goa Assembly: पावसाळ्यानंतर राज्यातील रस्त्यांवरील खड्डे एका महिन्यात बुजवणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

तोच, सरदेसाई यांनी ‘‘कामत हे ‘बीसीए’चे सदस्य नाहीत, त्यांनी आम्हाला नियम सांगू नयेत’’ असे सुनावले. विनंती करा, दादागिरी करू नये, आपण ती खपवून घेणार नाही, असेही ते म्‍हणाले. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्‍तक्षेप करत ‘‘कोणी येथे दादागिरी करत नाही, सर्वजण समान आहेत’’ असे सांगितले. तरीही काब्राल यांनी बीसीएच्या मिनिट्सची भाषा केली. त्यावर सरदेसाई यांनी मिनिट्स दाखवावेत, असे म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com