फोटोकॉपी मशिन लावून घरीचं छापल्या नोटा, मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

बनावट नोटा जप्त, आरोपीला अटक
police arrested a man for printing fake note in the house
police arrested a man for printing fake note in the house Dainik Gomantak
Published on
Updated on

नोएडा पोलिसांनी घरात खोट्या नोटा बनवणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. तो केवळ नोटा बनवत नाही तर त्या बनावट नोटा बाजारातही चालवत असे. नोएडाच्या सेक्टर 24 च्या पोलिसांनी या व्यक्तीला त्याच्या घरातूनच अटक केली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून 4,750 रुपयांच्या 1.17% फुलस्क्रीन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

police arrested a man for printing fake note in the house
नोकियाचा 'हा' मोबाइल करणार धमाल; तब्बल 18 दिवस टिकणार चार्जिंग आणि..

तर 90 कागदी बनावट नोटा, 198 अर्धवट नोटा, प्रिंटर आणि रिम पेपरही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकी यादव असे या आरोपीचे (Accused) नाव असून तो तारबगंज गोंडा येथील रहिवासी आहे. सध्या हा व्यक्ती नोएडातील गिझोड सेक्टर 53 भागात राहत होता. आरोपीकडे चौकशी केली असता तो येथे भाड्याने राहत होता व या भाड्याच्या घरात फोटोकॉपी मशीन लावून बनावट नोटा बनवत असे.

police arrested a man for printing fake note in the house
नोकियाचा 'हा' मोबाइल करणार धमाल; तब्बल 18 दिवस टिकणार चार्जिंग आणि..

आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक बनावट नोटा बाजारात चालवल्या आहेत. नोएडा पोलीस (police) याला दुजोरा देत आहेत. विशेष म्हणजे, नोटाबंदीनंतर उत्तर प्रदेश एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांनी बनावट नोटांच्या अनेक मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. सहसा या बनावट नोटा सीमेपलीकडून छापून भारतात आणल्या जातात, मात्र घरातच नोटा बनवण्याचे हे ताजे प्रकरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com