Goa : नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा युवा उद्योजक नंदादीप मनोहर राऊत यांना गोव्यात होणारी विधानसभा निवडणुकीची (assembly elections) उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रीय पक्षाबरोबर राज्य पातळीवरील पक्ष इच्छुक. याविषयी माजी नगराध्यक्ष राऊत यांना विचारले असता, राष्ट्रीय पातळीवरील व राज्यातील विविध पक्ष (Party) वास्कोतून (Vasco) येणारी विधानसभा निवडणूक लढवावी, यासाठी माझ्या संपर्कात आले असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
गोव्यात २०२२ मध्ये होणारी विधानसभा निवडणुकीत साठी राष्ट्रीय पक्षाबरोबर राज्यातील सर्व पक्ष तयारीला लागलेले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले होते. यात मुरगाव तालुक्यातून भाजपला शंभर टक्के यश प्राप्त झाले होते. नंतर भाजप सरकारने सत्ता स्थापन करून या तालुक्यातून एका आमदाराला मंत्रिपद देण्यात आले. पुढे याच तालुक्यातील आणखीन एका आमदाराला मंत्रिपद देण्यात आले. सध्या मुरगाव तालुक्यातुन मंत्रिमंडळात दोन मंत्री तर दोन आमदारांना महामंडळे देण्यात आली आहेत.
यामुळे मुरगाव तालुका भाजपचा बालेकिल्ला असल्याने, प्रामुख्याने सर्व पक्षाने याच तालुक्यातून आपल्या पक्षाकडून उमेदवार निवडण्याच्या तयारीला लागलेले आहे. यात काही राष्ट्रीय राज्यातील पक्षांनी वास्कोतून उमेदवार निवडण्यासाठी अनेकांना संपर्क साधलेला आहे. मुरगाव तालुक्यातील वास्को मतदार संघातून प्रभाग १५ मधील माजी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांचा प्रभाग यंदा पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी महिलांसाठी राखीव केल्याने, नंदादीप राऊत यांनी हा प्रभाग आपल्याकडे ठेवून येथून आपली पत्नी सौ. प्रिया नंदादीप राऊत यांना प्रचंड मताने निवडून नगरसेविका बनविले आहे.
यामुळे गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदादीप राऊत यांना अनेक पक्षाकडून वास्कोतून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव येत आहे. यात राष्ट्रीय पक्षाने राऊत यांच्याकडे अनेक वेळा संपर्क साधून वास्कोतुन आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी मागणी ठेवलेली आहे. तसेच राज्यातील पक्षांनी सुद्धा माजी नगराध्यक्ष राऊत यांना उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
वास्को मुंडवेल येथील युवा उद्योजक तथा मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी पालिकेत ५० वे नगराध्यक्षपद भूषविले होते. माजी नगराध्यक्ष राऊत याने आपल्या कार्यकाळात मुरगाव सडा येथील पालिकेच्या कचरा प्रकल्पात असलेला लाखो टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. तेथे नवीन पद्धतीचा कचरा प्रकल्प आणून दहा वर्षे साठलेला कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली. तसेच मुरगाव नगरपालिका इमारतीचे नूतनीकरण, नवीन चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मासळी मार्केट बांधून देण्यासाठी राज्य नगर विकास संस्था (सुडाला) करोडो रुपयांचे आर्थिक सहकार्य केले. याचबरोबर सडा येतील पालिका कचरा प्रकल्पात आणखीन कचरा प्रकल्प बांधण्यासाठी मान्यता दिली होती. तसेच आपल्या प्रभाग १५ मध्ये अंदाजे ३ कोटी पेक्षा जास्त रुपयांचे काम राऊत यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात केलेली आहे.
'माझ्या संपर्कात राष्ट्रीय व राज्यातील पक्ष'
राऊत गोव्यात २०२२ मध्ये पार पडणारी विधानसभा निवडणुकीसाठी वास्कोतून उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रीय पक्षाबरोबर गोव्यातील विविध पक्ष संपर्कात येत असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिली. तसेच माझ्या कार्यकर्त्यांचीसुद्धा येणारी विधानसभा वास्कोतून लढवावी अशी मागणी आहे. वास्को मतदार संघातून अनेकांनी मला भेटून येणारी विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. गोव्यातील राष्ट्रीय पक्षातील नेते माझ्या संपर्कात असून त्याने यंदा वास्कोतून मी उमेदवारी घ्यावी अशी इच्छा प्रकट केली आहे. गोव्यातील काही पक्षांनी माझ्याबरोबर बैठका घेऊन वास्कोतून आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी माझ्या समोर ठेवली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.