PM माेदी लवकरच गोव्यात; निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती

पर्यटन वाढीला मोपा विमानतळ गोवा राज्याचा मानबिंदू ठरणार आहे.
PM Modi
PM Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येत्या 1 सप्टेंबरपासून राज्यातील (Goa) नागरिकांना आता 16 हजार लिटर पाणी मोफत (Free Water) मिळणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM prmaod sawant) यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) केली. या घोषणेव्यतिरिक्त गोमंतकीयांच्या पारड्यात नवे काही पडले नाही. उलट, मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या योजनांची उजळणी केली.

येथील जुन्या सचिवालयासमोर ध्वजारोहणानंतर त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारताचे स्वप्न पाहिले आहे, त्याच धर्तीवर आम्ही ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा संकल्प केला आहे. तो सत्यात उतरविण्यासाठी गोमंतकीयांच्या सहकार्याची गरज आहे. राज्यावर अलीकडे कोविड महामारीसह अनेक संकटे आली. नैसर्गिक आपत्ती ओढवल्या तरी सरकारने हार मानली नाही. राज्यातील नागरिकांना हरप्रकारे मदत करण्यात आली आहे. यापुढेही सरकार मदतीसाठी कटिबध्द आहे.

मोप विमानतळाबाबत...

कोविड स्थितीवर नियंत्रण मिळवून पर्यटनाला वाव देण्यात सरकार कुठेच कमी पडले नाही. त्यामुळे गतवर्षभरात 33 हजार विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. पर्यटन वाढीला मोपा विमानतळ हे राज्याचा मानबिंदू ठरणार आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

व्यावसायिकांना 5 हजार

राज्यातील पारंपरिक व्यवसायिकांनाही कोविडचा फटका बसला आहे, त्यांनाही प्रत्येकी पाच हजारांची मदत देण्यात येणार आहे. विशेषतः महामारीच्या काळात आरोग्य खात्याने उत्तम कामगिरी केल्याचे ते म्हणाले. कोविडयोध्यांचे त्यांनी आभार मानले. आतापर्यंत 90 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून लवकरच 100 टक्के लसीकरण पूर्ण होईल.

PM Modi
Goa: नाईट कर्फ्यूत 23 ऑगस्टपर्यंत वाढ

माेदी लवकरच गोव्यात

मुख्यमंत्र्यांचे अभिभाषण हे राजकारणप्रेरित होते हे लपून राहिले नाही. त्यांनी अनेकवेळा त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भलावण केली. तसेच ते विविध कार्यक्रमांना लवकरच उपस्थिती लावतील, असे प्रतिपादन भाषणात किमान पाचवेळा केले. एकंदर निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांना राज्यात आणून वातावरणनिर्मिती करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे दिसून आले.

10 हजार हेक्टरमध्ये सेंद्रीय शेती; 65 हजार 133 किसान कार्डचे वितरण

कृषी क्षेत्रात राज्य स्वावलंबी व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला असून 10 हजार हेक्टरमध्ये सेंद्रीय शेती केली जात आहे. त्यासाठी 12 हजार 389 शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. 65 हजार 133 किसान कार्डचे वितरण करण्यासह आतापर्यंत 9 हजार 19 लाखांची मदत केली आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

PM Modi
Goa Assembly Elections: कळंगुटातून लोबोंचा होणार पत्ता कट?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com