'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

Goa Assembly Election 2027: गोवा आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी पुन्हा एकदा राज्यातील विरोधी पक्षातील पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
Amit Palekar
Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Election 2027: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्यासाठी आम आदमी पक्षाने आतापासून राजकीय रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. गोवा आपचे अध्यक्ष अमित पालेकर (Amit Palekar) यांनी पुन्हा एकदा राज्यातील विरोधी पक्षातील पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही कोणाशीही युती करण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा पालेकर यांनी म्हटले.

काय म्हणाले पालेकर?

पालेकर म्हणाले की, ''आम्हाला गोव्यात भाजपला (BJP) पराभूत करायचे आहे. हे साध्य करण्यासाठी आम्ही कोणाशीही युती करण्यास तयार आहोत, परंतु ही युती निवडणुकीच्या वेळी नाही तर आताच झाली पाहिजे. 2 ऑक्टोबर रोजी एकत्र येऊया आणि राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी मोहीम सुरु करुया.''

Amit Palekar
Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांनी गोव्‍यात एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी लोकांकडून होत आहे. या लोकभावनेचा आदर करुन आम आदमी पार्टी तशी युती करण्‍यास तयार आहे. पण दुसऱ्या पक्षांची तशी तयारी आहे का? असा सवाल यापूर्वी बोलताना पालेकर यांनी उपस्थित केला होता.

उगाच आम्‍हाला भाजपची बी टीम म्‍हणून हिणवण्‍यापेक्षा काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी युतीसाठी त्‍यांची तयारी आहे का, हे स्‍पष्‍ट करावे. जर त्‍यांना पाहिजे तर युतीची बोलणी करण्‍यासाठी मी आमच्‍या केंद्रीय नेत्‍यांना उद्याही गोव्‍यात बोलावण्‍यास तयार आहे. काँग्रेसची तशी तयारी आहे का? असेही पालेकर म्हणाले होते.

Amit Palekar
Goa Politics: 'पोलिस सत्‍य निश्‍चित बाहेर आणतील'! काणकोणकर प्रकरणी विरोधकांचे राजकारण; CM, प्रदेशाध्‍यक्षांचा हल्लाबोल

‘गोमन्‍तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात बोलताना त्‍यांनी आज तुमच्‍या कार्यक्रमातून मी इतर पक्षांसमोर हा युतीचा प्रस्‍ताव मांडतो. मात्र युती करायची असेल तर ती आताच करायला पाहिजे. निवडणूक ताेंडावर येऊन शेवटच्‍या क्षणाला युती केली तर त्‍याचा काहीही फायदा होणार नाही असेही पालेकर म्हणाले होते.

Amit Palekar
Goa Politics: "भाजपच्या रावण राज्यात गोमंतकीय एकत्र", मुख्य आरोपीला अटक न केल्यास NH 66 बंद!विरोधकांचा सरकारला इशारा

गोव्‍याबद्दलचा जो काही निर्णय घ्‍यायचा आहे तो आमच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाने गोवा युनिटवर सोपवला आहे. आता विराेधी पक्ष पुढे येतात की नाही ते त्‍यांनी ठरवावे, असेही शेवटी पालेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com