Govind Gaude: अटल सेतूविरोधातील वक्तव्य गावडेंना भोवले, पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल

पक्षश्रेष्ठी संतापले : अटल सेतूविरोधात केलेल्या वक्तव्याची घेतली गंभीर दखल
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Govind Gaude कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी आपला कला अकादमी गफला प्रकरणात बचाव करताना सवर्णांनी कुभांड रचल्याचा आरोप करीत अटल सेतू विषयावरून भाजप पक्षश्रेष्ठींविरुद्ध दुगाण्या झाडल्या; त्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे.

गावडे यांनी स्वत:चे समर्थन करण्यासाठी शनिवारी फर्मागुढी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात काही भाजप मंत्र्यांनाही लक्ष्य करण्यात आले. त्यामुळेही भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गोविंद गावडे गोवा विधानसभेत त्यांच्या विरोधात विरोधकांनी उघडलेली आघाडी आणि त्यांचे मंत्रिपद काढून घेतली जाण्याची शक्यता यांमुळे संतापले असून त्यांनी अटल सेतूच्या प्रणेत्यांविरोधात जी ‘चिखलफेक’ केली, त्यामुळे पक्षात नाराजीचा सूर आहे.

पक्षाच्या सुकाणू समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींनी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्यापासून घडलेल्या विविध घटना आणि वक्तव्ये तसेच विधानसभेतील निवेदने यांचा संपूर्ण तपशील मागितला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही या घटनाक्रमामुळे व्यथित झाले आहेत.

‘अटल सेतू’बद्दल गोव्यात कार्यकर्त्यांच्या जशा भावना आहेत, तशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कल्पनेतून हा अद्वितीय पूल साकारला आहे. त्याच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्यात आले होते.

पुलाचे उदघाटन २७ जानेवारी २०१९ रोजी झाले होते. या पुलासाठी सर्व सोपस्कार पाळले गेले आहेत का, सर्व मान्यता मिळविल्या आहेत का, याची शहानिशा स्वत: पंतप्रधानांनी केली होती.

त्यामुळे अटल सेतूविरोधात वक्तव्य म्हणजे गोव्यातील भाजपचे प्रेरणास्थान मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही हा अपमान असल्याची भाजपची भावना झाली आहे, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

‘तुम्ही कला अकादमीच्या बांधकामाबद्दल बोलताना थांबत नाही, परंतु तेच लोक अटल सेतू व अबकारी घोटाळ्याबद्दल गप्प आहेत, असे उदगार गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काढले होते. त्यानंतर हे प्रकरण आपल्यावर शेकण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपण तसे म्हटलेच नव्हते, असा पवित्रा घेतला होता.

परंतु त्यानंतरही आक्रमक होत गावडे यांनी स्वत:च्या समर्थनार्थ पंचायतींना बोलायला भाग पाडले व एसटी समाजाच्या नेत्यांनाही आपल्या समर्थनार्थ बोलण्यास प्रवृत्त केले.

फर्मागुढी येथे मेळावा घेणे व भाजपचे काही मंत्रीही आपल्याविरोधात कट करताहेत, असा आरोप करणे गावडे यांना महागात पडू शकते. गावडे यांच्याविरोधात भाजपमध्ये कमालीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Govind Gaude
Amboli Accident News : तीन गाड्यांना ठोकून पळणाऱ्यास आंबोलीत घेतले ताब्यात

प्रियोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे गावडे यांना समर्थन

प्रियोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक फर्मागुढी येथील गोपाळ गणपती मंदिराच्या सभागृहात झाली. या बैठकीत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या भूमिकेचे समर्थन करण्यात आले.

मंत्री गावडे यांना सध्या लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला असून त्यांचा कला अकादमीतील खुला रंगमंच कोसळण्याशी काडीचाही संबंध नाही.

त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे, अशी भूमिका या बैठकीत वक्त्यांनी मांडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रियोळ प्रगती मंचचे प्रमुख युगांक नाईक होते.

Govind Gaude
Vishal Golatkar Murder Case: विशाल गोलतकर खून प्रकरणाशी संबंधित शस्त्रे जप्त

मंत्री गावडे हे आपल्या कामामध्ये चोख आहेत. ते कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत. परंतु काही प्रवृत्ती त्यांच्या विरोधात आहेत आणि या प्रवृत्तींना गावडे यांना मंत्रिमंडळामधून हटवले गेलेले हवे आहे, असे मत नेत्यांनी मांडले.

गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यास ते चुकीचे ठरेल. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही. उलट त्यांच्या सहभागामुळे भाजप सरकारला प्रत्यक्षात फायदा झाला असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चा

सावईवेरे येथील सरकारी शाळेचा उद्‍घाटन सोहळा शनिवारी आयोजित केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या शाळेचे उद्‍घाटन होणार होते. तशी पत्रिकाही सर्वांना पाठवली होती. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री या कार्यक्रमाला आले नाहीत.

सध्या गोविंद गावडेंना टार्गेट केले जात असल्याने त्यांच्या मतदारसंघातील लोक सरकारप्रती, खासकरून मुख्यमंत्री सावंत यांच्यावर नाराज आहेत. लोकांच्या या रोषाचा सामना करावा लागणार की काय? या विचारानेच मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला टाळणे पसंत केले असावे, असा अंदाज येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Govind Gaude
Goa Crime News : जयेश चोडणकर खून प्रकरणातील संशयितांच्या लाय डिटेक्टर चाचणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

मंत्री गावडे यांच्या बाजूने काही पंचायती

कला अकादमीबाबत मंत्री गोविंद गावडे यांच्यावर होणारा आरोप आणि टीकेला खुद्द गावडे यांनी वेगवेगळ्या वाहिन्यांच्या पत्रकारांमार्फत उत्तर दिले. त्यात आपला काडीमात्र संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर त्यांच्या प्रियोळ मतदारसंघातील तीन पंचायती म्हणजे म्हार्दोळ, तिवरे-वरगाव आणि बेतकी-खांडोळातील सरपंच व इतर पंचायत मंडळांतर्फेही गावडे समर्थनार्थ एकच भाषण पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. विरोधक विनाकारण गावडे यांच्यावर आरोप करीत असल्याचा सूरही या पत्रकार परिषदेत उमटला होता.

काय बोलले होते गोविंद गावडे

तुम्ही कला अकादमीच्या बांधकामाबद्दल बोलताना थांबत नाही, परंतु तेच लोक अटल सेतू व अबकारी घोटाळ्याबद्दल गप्प आहेत, असे उद्‍गार गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काढले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com