Goa Assagao : पूजा शर्मा हिला दिलासा नाहीच; अटकपूर्व जामीन फेटाळला

Goa Assagao House Demolition Case : अटकेपासून संरक्षण देण्यासही नकार
Assagao House Demolition Case
Goa Assagao House Demolition CaseCanva
Published on
Updated on

पणजी, आसगाव येथील आगरवाडेकर घर मोडतोड प्रकरणात पूजा शर्मा हीच मुख्य संशयित असल्याचे पोलिसांचे म्हणणे असले, तरी पोलिसांनी अद्याप तिला अटक केलेली नाही.

जिल्हा सत्र न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, तर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अटकेपासून अंतरिम आदेशाद्वारे संरक्षण देण्यास नकार दिला.

पूजा हिने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तिने ही याचिका सादर केल्याची माहिती तिच्या वकीलांनी एक सदस्यीय खंडपीठासमोर दिली. त्यावर खंडपीठाने मागणी काय आहे अशी विचारणा केली, तेव्हा त्यांनी अटकेपासून संरक्षण असे उत्तर दिले.

त्यावर जिल्हा न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते का अशी विचारणा, त्याला त्यांनी नाही असे उत्तर दिले. सरकारी वकीलांनी पूजा हीच मुख्‍य संशयित असल्याने तिची चौकशी आवश्यक आहे, त्यामुळे अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात येऊ नये, असे सांगितले. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Assagao House Demolition Case
Goa Water Supply Department: भरपावसात कवळेतील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त; पाणी पुरवठा विभागाचा कामगिरी

पोलिसांचे सबुरीचे धोरण

दोन्ही न्यायालयाने पूजा हिला अटकेपासून संरक्षण दिलेले नाही. पूजा हिची चौकशी करणे आवश्यक आहे असे पोलिस न्यायालयात सांगतात, तर दुसरीकडे तिला केवळ बोलावणे पाठवण्यापलिकडे काही करत नाहीत. पोलिसांनीही सध्या जरा सबुरीने असे धोरण अवलंबल्याचे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com