Goa Water Supply Department: भरपावसात कवळेतील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त; पाणी पुरवठा विभागाचा कामगिरी

Paunwada Kawlem: प्रतिकूल परिस्थितीतही पाणी पुरवठा सुरळीत केल्याने ग्रामस्थांनी आभार मानले
Paunwada Kawlem: प्रतिकूल परिस्थितीतही पाणी पुरवठा सुरळीत केल्याने ग्रामस्थांनी आभार मानले
Paunwada-Kawlem Water SupplyDainik Gomantak
Published on
Updated on

पाऊणवाडा - कवळे येथील जलवाहिनी फुटल्याने कवळे, तळावली, दुर्भाट आणि आगापूर भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. जेसीबीमुळे ही जलवाहिनी फुटली होती. यासंबंधी कवळेच्या सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्‍वरकर, पंचसदस्य प्रिया डोईफोडे यांनी लगेच फुटलेल्या जलवाहिनीची पाहणी केली व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाला कळवले.

त्यानंतर खात्याचे अभियंते यशवंत मापारी यांनी या प्रकाराची त्वरित दखल घेऊन खात्याच्या कर्मचाऱ्यांकरवी धो धो पावसातही ही जलवाहिनी दुरुस्त करून दिली. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला. आपत्कालीन वेळेत पाणी पुरवठा खात्याने प्रतिकूल परिस्थितीतही पाणी पुरवठा सुरळीत केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे तसेच पंचायतीचे आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com