Goa :गोमंतक भंडारी समाजाच्या अध्यक्षपदी पुन्हा अशोक नाईक

फोंड्यात झालेल्या ऑनलाईन आमसभेत निर्णय (Goa)
As Ashok Naik was re-elected as the President of the Gomantak Bhandari Samaj at a public meeting held in Ponda-Goa, the executive members congratulated him by laying wreaths.
29th Aug. 2021
As Ashok Naik was re-elected as the President of the Gomantak Bhandari Samaj at a public meeting held in Ponda-Goa, the executive members congratulated him by laying wreaths. 29th Aug. 2021Dainik Gomantak

गोमंतक भंडारी समाजाच्या (Gomantak Bhandari Samaj) ऑनलाईन झालेल्या आमसभेत (Online Public Meeting) अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, (Three Year's Extention) या आमसभेत गोमंतक भंडारी समाजाच्या अध्यक्षपदी अशोक नाईक यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली. ही ऑनलाईन आमसभा शांतीनगर - फोंड्यातील रुक्मिणी सभागृहात झाली. आमसभेत केंद्रीय कार्यकारिणीवर (Central Executive) विनाकारण पोलिसांत तक्रार करून मनस्ताप दिल्याबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा यावेळी निर्णय झाला. लेखा अहवालाला मंजुरी तसेच सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवरही आमसभेत चर्चा करण्यात आली. (The approval of the audit report as well as the questions raised by the members were also discussed in the general meeting.) गोमंतक भंडारी समाजाचे विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेला उपाध्यक्ष देवानंद नाईक, सरचिटणीस फक्रू पणजीकर, खजिनदार जगुसो नाईक तसेच कृष्णकांत गोवेकर, सुनील नाईक, एकनाथ नाईक तारी आदी समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. कोविड महामारीमुळे ही आमसभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

As Ashok Naik was re-elected as the President of the Gomantak Bhandari Samaj at a public meeting held in Ponda-Goa, the executive members congratulated him by laying wreaths.
29th Aug. 2021
Goa: भाजपच्या जुमला सरकारवर जनतेचा विश्वास नाही; दिगंबर कामतांचे टीकास्त्र

आमसभेत अध्यक्ष अशोक नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मागील खर्च तसेच प्रगती संकुलाचा लेखा अहवाल आदी आमसभेत मांडण्यात आले. त्याला हरकतीसाठी वेळ देण्यात आला, मात्र निर्धारित मुदतीत कोणतीच हरकत आली नसल्याने हे लेखा अहवाल मंजूर करण्यात आले. गेल्या २५ नोव्हेंबर २०१८ रोजी गोमंतक भंडारी समाजाची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली होती. या कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने नव्याने कार्यकारिणी न निवडता आहे त्याच कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय आमसभेत झाला. समाजाशीसंबंधित न्यायालयीन खटले तसेच इतर बाबी समोर ठेवून विद्यमान कार्यकारिणीला ही मुदतवाढ दिली जात असल्याचे तालुका कार्यकारिणी सदस्यांनी सांगितले. मुदतवाढ दिल्यामुळे विद्यमान कार्यकारिणीने गेल्या तीन वर्षांत केलेल्या चांगल्या कार्याची ही पावती असल्याचे सदस्यांनी जाहीर करून मुदतवाढ दिल्याबद्दल आभार मानले. समाजाच्या उत्कर्ष आणि हितासाठी सर्व बांधवांनी एकजुटीने कार्य करूया अशी हाक देताना समाजाच्या हितासाठी विद्यमान कार्यकारिणी कार्यरत राहील, अशी ग्वाहीही अध्यक्ष अशोक नाईक व कार्यकारिणी सदस्यांनी यावेळी दिली.

As Ashok Naik was re-elected as the President of the Gomantak Bhandari Samaj at a public meeting held in Ponda-Goa, the executive members congratulated him by laying wreaths.
29th Aug. 2021
Goa: जगप्रसिद्ध ग्रेटर डेन जीनचे दिस्टीलर जय धवन यांचा समूद्रात बुडून मृत्यू

गोमंतक भंडारी समाजाच्या कार्यकारिणीवर नाहक आरोप करून पणजी पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली. या तक्रारीनुसार अध्यक्ष तसेच इतरांना पोलिस स्थानकात बोलावण्यात आले, मात्र साडे सहा तास विनाकारण बसवून ठेवण्यात आले. पोलिसांना शेवटपर्यंत तक्रारीत काहीच तथ्य सापडले नाही. मात्र कार्यकारिणी सदस्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. कार्यकारिणीला पोलिसांत बोलावून एकप्रकारे समाजाचा अवमान करण्यासारखे असून याप्रकरणी आतिश मांद्रेकर तसेच इतर सत्तावीस जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय आमसभेत घेण्यात आला. समाजाच्या नावाखाली कुणीही कुठेही हिशेब मागून जाहीर आरोप करून समाजाचे नाव बदनाम करण्याचा प्रकार यापुढे होता कामा नये यासाठीच ही कारवाई समाजातर्फे करण्यात येणार असून कुणाला काही शंका असल्यास त्यांनी समाजाच्या कार्यालयात संपर्क साधावा, थेट आरोप करू नये, असे आवाहनही विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक यांनी केले.

As Ashok Naik was re-elected as the President of the Gomantak Bhandari Samaj at a public meeting held in Ponda-Goa, the executive members congratulated him by laying wreaths.
29th Aug. 2021
Goa: आमदार विश्‍वजित राणेंचा पुरग्रस्तांच्या कुटुंबांना मदतीचा हात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com