गोव्यातील सशस्त्र दलाच्या जवानांनी उत्तरप्रदेश येथे निवडणुकीवेळी बजावली सेवा

मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी केले सहकार्य; वृध्द व गरजू मतदारांना केली मदत .
 उत्तरप्रदेश येथे प्रयाग जिल्ह्यात पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी सेवा बजावताना वृध्दांना मदत करताना गोव्यातील  सशस्त्र दलाचे जवान.
उत्तरप्रदेश येथे प्रयाग जिल्ह्यात पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी सेवा बजावताना वृध्दांना मदत करताना गोव्यातील सशस्त्र दलाचे जवान.Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोव्यातील 900 सशस्त्र दलाच्या जवानांनी रविवारी (दि. 27) उत्तरप्रदेश येथे प्रयाग जिल्ह्यात पाचव्या टप्प्यातील निवडणुकीवेळी सेवा बजावली. ज्या मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी सहकार्य पाहिजे अशा वृध्द व गरजू मतदारांना मदत केली. (Goa Armed Forces personnel perform service during elections in Uttar Pradesh)

 उत्तरप्रदेश येथे प्रयाग जिल्ह्यात पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी सेवा बजावताना वृध्दांना मदत करताना गोव्यातील  सशस्त्र दलाचे जवान.
कार्निवल परेडच्या पार्श्वभूमीवर मडगावमधील वाहतूक आणि पार्किंग नियोजन
Goa Armed Forces
Goa Armed Forces Dainik Gomantak

आज दि.27 रविवारी उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथे पाचव्या टप्प्यात मतदान (Assembly Election 2022) झाले. तेथे सेवा बजावण्यासाठी राज्यातील 900 सशस्त्र पोलीस जवानांना पाठवण्यात आले आहे. दोन आठवड्यापूर्वी ते उत्तरप्रदेशला रवाना झाले होते. पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरप्रदेश येथे गोवा सशस्त्र पोलीस दलाचे ९ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक आणि जवान मिळून 900 जणांचा फाटा तेथे पाठवण्यात आला होता. गोवा सशस्त्र पोलीस (Police) जवान,अधिकाऱ्यांनी ललीतपूर आणि जालौ या जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा बजावली.त्यानंतर आज पाचव्या टप्प्याच्या प्रयाग येथे मतदान केंद्रावर सेवा बजावली.सेवे दरम्यान सर्व उपस्थित जवानांनी वृध्दांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचे महान कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com