Goa: विकसित भारत, विकसित गुजरातशी गोवा सुसंगत! अहमदाबाद येथे झालेल्या EDII च्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

Pramod Sawant: अहमदाबाद येथे झालेल्या इंडियन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी ऑनलाइन उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Pramod Sawant
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप राष्ट्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या प्रक्रियेत ईडीआयआयने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गोवा देखील ‘विकसित भारत’ व ‘विकसित गुजरात’ या संकल्पनांशी सुसंगत, स्टार्टअप अनुकूल इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या अनोख्या विकास मॉडेलचे कौतुक करत ईडीआयआयच्या कार्याची प्रशंसा केली.

अहमदाबाद येथे झालेल्या इंडियन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या (ईडीआयआय) ४३ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑनलाइन उपस्थित राहून उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पिरूझ खांबट्टा (अध्यक्ष, रासना ग्रुप आणि ऑनरेरी कॉन्सुल जनरल, दक्षिण कोरिया – गुजरात), सुनील अंचिपाका (सचिव, उद्योग विभाग, गोवा), बी. एस. पै आंगल (व्यवस्थापकीय संचालक, ईडीसी लिमिटेड, गोवा), दिनेशसिंह रावत (मुख्य महाव्यवस्थापक व विभागीय प्रमुख, आयडीबीआय बँक, अहमदाबाद) व डॉ. सुनील शुक्ला (महासंचालक, ईडीआयआय) उपस्थित होते.

Pramod Sawant
Goa Cabinet Decision: गोमंतकियांसाठी सुवार्ता! घर दुरुस्तीसाठी केवळ ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी, बीडीओंच्या पाहणीची आवश्‍यकता नाही, CM सावंतांनी दिली माहिती

मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने ईडीआयआय-गोवा केंद्राच्या कार्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, गोव्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी मी स्वतः गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या केंद्राची आवश्यकता मांडली होती आणि त्यानंतर ईडीआयआय-गोवा केंद्राची स्थापना झाली. हे केंद्र आज गोव्यातील नवउद्योजकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सहकार्य पुरवत आहे.

Pramod Sawant
Babasaheb Ambedkar Bhavan Goa: पर्वरीत होणार आंबेडकर भवन; 10 कोटी रुपयांची तरतूद, CM सावंत यांची माहिती

‘गोवा हे व्यवसायाचे उत्तम राज्य’

सुनील अंचिपाका यांनी सांगितले की, गोवा ही संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यवसाय यांचे उत्तम मिश्रण असलेले राज्य आहे. ईडीआयआय-गोवा केंद्र व इडीसी लिमिटडच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गोव्यात उद्योजकतेला नवे वाव मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com