महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा भाषेच्या संवर्धनासाठी कंबर कसली आहे. गोवा सरकार आणि महाराष्ट्र सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकत्र येणार आहेत. महाराष्ट्र सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर याबाबत बोलताना म्हणाले.
(Goa and Maharashtra governments to tie up over promotion of Marathi language - Deepak Vasant Kesarkar )
याबाबत बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले मराठी भाषा ही महाराष्ट्र, गोवा कर्नाटकचा काही भाग मध्य प्रदेशातील ग्वालियर, इंदौर, हरयानातील पानिपत या ठिकाणावर आज ही बोलली जाते.
आता महाराष्ट्र सरकार मराठी भाषा प्रसार, संवर्धनासाठी गोव्याशी करार करण्याचाही प्रयत्नशिल आहेे. तसेच गोवा राज्याच्या पर्यटन विकासासाठी संयुक्त उपक्रम राबवणार आहे. गोवा राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार व गोवा सरकार एकत्र काम करणार आहेत. असे ही ते यावेळी म्हणाले.
गोवा सरकारसोबत एकत्र येताना गोव्यातील क्रीडा संकूल, पर्यटनासाठीचे नवी धोरणे, उच्च दर्जाचे रस्ते, मुंबई-गोवा कोस्टल महामार्ग प्रश्न तातडीने सोडवला जाणार आहे. याबरोबर पर्यटनासाठी जे-जे करता येईल त्यासाठी आम्ही सकारात्मकपणे काम करणार आहे, असं ही केसरकर यावेळी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.