Divar Island|स्वर्गाहुन सुंदर ठिकाणाकडे नेणारा गोव्यातील हा बेट तूम्हाला माहित आहे?

गोव्यातील पणजीपासून 10 किमी अंतरावर असलेले दिवार बेट हे घनदाट जंगलात निसर्गाच्या सौंदर्यात नटलेले आहे.
 Island
IslandDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील पणजीपासून 10 किमी अंतरावर असलेले दिवार बेट हे घनदाट जंगलात निसर्गाच्या सौंदर्यात नटलेले आहे. या बेटावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. जुन्या गोव्यातून फक्त फेरी सेवेद्वारे या बेटावर तूम्ही जाऊ शकता. हे बेट नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता यांचा उत्तम मेळ आहे. या बेटाची ओळख ‘वेळेत अडकलेलं गाव’ म्हणून गोव्यात आहे; पर्यटन किंवा व्यापारीकरणामुळे ते शहराच्या जीवनापासून थोडे दुरावले आहे.

(divar island in Goa that leads to a beautiful place)

 Island
Goa: झरेश्‍वर गणेशोत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्‍पद

दिवार बेट पोर्तुगीज शैलीत बांधलेल्या विंटेज घरांनी नटलेले आहे, पारंपारिक चर्चने भरलेले आहे आणि सदाहरित भातशेतींनी वेढलेले आहे. ‘दिवार’ हा शब्द ‘दिपावती’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ कोकणी भाषेत ‘लहान बेट’ असा होतो. या शब्दाचा उच्चार ‘दिवड्डी’ असा होतो. दिवार बेटावर काही खास प्रेक्षणीय स्थळे नसली तरी, अरुंद वळणदार रस्त्यांचे जन्मजात सौंदर्य आणि आकर्षण, चहाचे छोटे स्टॉल्स आहेत.

दिवार बेटावरील तलाव आणि स्मशानभूमी कर्नाटक-गोवा यांच्यातील दुवा

गोव्याच्या (Goa) दिवार बेटावर एक तलाव आणि स्मशानभूमी कर्नाटक (Karnatak) आणि गोवा यांच्यातील जुने संबध दर्शविते. कोटी तीर्थ ताली हा एक तलाव आहे ज्यामध्ये 108 कोरीव पोकळ्या आहेत, ज्यामध्ये लहान गोपुरम सारखी रचना आहे. आणि आयताकृती तलाव लॅटराइट-दगडाच्या पायऱ्यांनी वलयांकित आहे. नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी भेट द्यायला अनेक पर्यटक (Tourist) येतात तेव्हा या आकाराचा तलाव पाण्याने भरलेला असल्याने सुंदर दिसतो आणि प्रत्येकाला आकर्षित करतो. इतिहासकार म्हणतात की, कदंब (Kadamba) राजांचे कुलदैवत असलेल्या सप्तकोटीश्वर कल्याणी मंदिराचा (मंदिर तलाव) हा भाग आहे, ज्यांनी 10 व्या आणि 14 व्या शतकादरम्यान या क्षेत्रावर राज्य केले होते.

 Island
Goa: ‘नाईट लाईफ’ ही गोव्याची संस्कृती नाही!

दिवार बेटावर दोन प्रमुख मंदिरे होती

गोव्यातील एके काळी भरभराट झालेल्या कदंब युगाचा हा पुरातत्वीय पुरावा आहे जो आपल्याला त्या काळात घेवून जातो. इतिहासाची आठवण करून देतो. गोव्यातील इतिहासकार रोहित फळगावकर म्हणतात की, दिवार बेटावर दोन प्रमुख मंदिरे होती - सप्तकोटीश्वर मंदिर आणि गणपती मंदिर. अल्लाउद्दीन हसन गंगूच्या बहामनी राजवटीत सप्तकोटीश्वर मंदिर नष्ट झाले. 1391 मध्ये विजयनगर राज्यातील मंत्री माधव यांनी याची पुनर्बांधणी केली. विजयनगरच्या ताम्रपटात याची नोंद आहे, असे फलगावकर सांगतात. 1540 मध्ये, पोर्तुगीजांनी संपूर्ण संरचना पुन्हा नष्ट केली. 1558 मध्ये, देवीची मूर्ती नदी ओलांडून डिचोली येथे हलविण्यात आली, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 मध्ये दुसरे सप्तकोटीश्वर मंदिर स्थापित केले होते. तलाव पाण्याचा स्त्रोत असल्याने तसाच राहिला. कालांतराने त्यातील काही भाग वाहून गेला.

मंदिर आणि चर्च

“या चर्चजवळ (Church) जुन्या मंदिराचे (Temple) अवशेष सापडले, ज्याचे इतिहासकारांनी दस्तऐवजीकरण केले आहे, या चर्चजवळील स्मशानभूमीच्या आतील नक्षीकाम, दगडी ट्रेसरी आणि चॅपलची छत देखील 14 व्या शतकातील कदंब राजवंशातील आहे,” असे फाळगावकर सांगतात. स्थलांतरनानंतर या गणपती मंदिरातील मूर्ती फोंडा (Ponda) तालुक्यातील खांडेपार आणि नंतर जवळच्या खांडोळा गावात हलवण्यात आली. खांडोळ्यातील मंदिरात दिवारची जुनी मूर्ती तसेच नवीन मूर्ती आताही आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com