Goa Daily News Wrap: क्राईम, राजकारण, क्रीडा, निवडणूक; गोव्यातील दिवसभरातील बातम्यांचा आढावा

28 March 2024 Today's Goa And Konkan Live News and Update: राज्यातील क्राईम, राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भातील बातम्यांचा आढावा.
Goa and Konkan News
Goa and Konkan NewsDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल येथून 1.69 कोटींचे ड्रग्ज जप्त; रशियन नागरिकाला अटक

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून हरमल येथे 1.69 कोटींचे वेगवेगळ्या प्रकाराचे ड्रग्ज जप्त. एव्हगेनी मोर्कोविन या रशियन नारिकाला अटक. रशियन नागरिकाकडून 218 ग्रॅम सायलोसायबिन मशरूम, 7.9 किलो मशरूमच्या कळ्या, 2 किलो गांजा आणि 150 नग सायलोसायबिन मशरूमच्या बिया जप्त.

सरकारने मद्य घोटाळा प्रकरणात भंडारी समाजाच्या नेत्यांचा छळ सुरू केलाय - किरण कांदोळकर

सरकारने मद्य घोटाळा प्रकरणात भंडारी समाजाच्या नेत्यांचा छळ सुरू केला आहे, त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा माजी आमदार किरण कांदोळकर यांनी दिला आहे. हरवळे येथील रुद्रेश्वर देवस्थान प्रकरणी गोंधळ उडण्यास सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

दाबोळी - चिखलीत 28, 540 रुपयांची देशी विदेशी मद्य जप्त

वास्को पोलिसांनी दाबोळी - चिखली येथील जॉगर्स पार्क जवळ 28 हजार 540 रुपयांची देशी विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. वास्को पोलिसांनी सर्व मद्यसाठा वास्को अबकारी विभागाच्या स्वाधीन केला आहे.

Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

पालेकरांना ईडीचे समन्स ही सत्ताधारी पक्षाची प्रमाणित कार्यपद्धती - सरदेसाई

आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांना ईडीचे समन्स ही सत्ताधारी पक्षाची प्रमाणित कार्यपद्धती आहे. पालेकर तपासात सहकार्य करत आहेत आणि हा योग्य दृष्टीकोन आहे असे, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.

गोव्यात 19 हजार 573 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Goa SSC Board Exam

राज्यभरात 1 एप्रिल पासून 10 वी बोर्डची परीक्षा सुरू होत असून एकूण 31 परीक्षा केंद्रामधून 19 हजार 573 विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असून 9757 विद्यार्थी आणि 9816 विद्यार्थीनी परीक्षा देणार आहेत.

केवळ इंडिया आघाडी लोकशाहीचे रक्षण करु शकेल - व्हिएगस

ईडीने अल्पसंख्याक आणि बहुजन समाजातील नेत्यांना समन्स बजावला आहे. हा छळ असल्याचे आरोप, आमदार वेंझी व्हिएगस यांनी केला आहे. हीच वेळ आहे आपण सर्वांना एकत्र येण्याची, केवळ इंडिया आघाडी लोकशाहीचे रक्षण करु शकेल, असे आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले आहेत.

MLA Venzy Viegas
MLA Venzy ViegasDainik Gomantak

मेरशीत मोठी वाहतूक कोंडी, तीन रुग्णवाहिका अडकल्या

Traffic Jam In Merces

मेरशीत मोठी वाहतूक कोंडी झाली असून, तीन रुग्णवाहिका अडकून पडल्या आहेत. वाहतूक कोंडीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ताळगाव पंचायतीची 28 एप्रिल रोजी निवडणूक, 4 प्रभाग महिलांसाठी राखीव

Talgaon Panchayat Election

ताळगाव पंचायत निवडणुकीसाठी राखीव प्रभागांची घोषणा. महिलांसाठी चार प्रभाग राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी पाच आणि इतर मागास वर्गासाठी एक प्रभाग राखीव ठेवण्यात आला आहे. ताळगाव पंचायती निवडणूक 28 एप्रिल रोजी होईल.

Talgaon Panchayat Election
Talgaon Panchayat ElectionDainik Gomantak

Goa Murder Case: पेडा-बाणावली खून प्रकरण; सूरज मायगेरीला नऊ दिवसांची पोलिस कोठडी

पेडा-बाणावली येथील विश्वनाथ सिधनलच्या खूनप्रकरणी सूरज मायगेरी (कडोळी, बेळगाव) याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी. यापूर्वी विश्वनाथ यांच्या पत्नी वैभवी उर्फ मंगल सिधनलला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने सहा महिन्यांपूर्वी पत्नी वैभवीने प्रियकर सूरजसोबत कट रचून हा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

Goa Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak

डेटा घेऊन या! ईडीने पालेकरांकडे मागितली माहिती

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी आपचे गोवा संयोजक अमित पालेकर यांच्यासह रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक पणजीतील ईडी कार्यालयात दाखल झाले असून, त्यांची चौकशीची पहिली फेरी पार पडली आहे.

कार्यालयात लंच ब्रेक झाल्याने चारहीजण बाहेर पडले असून, त्यांना पुन्हा दुपारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

ईडीचा गैरवापर केला जातोय - वेंझी व्हिएगस

ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी केला आहे. आप राजकारणातील नवा ब्रॅन्ड असून, आम्ही गोव्याची आशा आहे. ज्यावेळी गोष्टी बदलतील त्यावेळी हाच PMLA त्यांची शिकार करेल, असे व्हिएगस म्हणाले.

Goa AAP Leader Reach ED Office: गोव्यातील आप नेते पणजीतील ईडीच्या कार्यालयात दाखल

Goa AAP Leader Reach ED Office In Panaji

गोव्यातील आप नेते पणजीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने बुधवारी गोवा संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांना समन्स बजावला होता. सर्वजण चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

गुड फ्रायडेला गोव्यातील सर्व मटका शॉप बंद ठेवा ; वॉरन आलेमाव यांची मागणी

Close Matka Shops In Goa On Good Friday

गुड फ्रायडेला गोव्यातील सर्व मटका शॉप बंद ठेवले जावेत अशी, मागणी वॉरन आलेमाव यांनी केली आहे. याबाबत सरकारने सर्व पोलिस स्थानकांना सूचना द्यावी. दिवाळी आणि इतर सणासुदीच्या काळात मटका शॉप बंद ठेवले जातात त्याचप्रमाणे गुड फ्रायडेला शॉप बंद ठेवावेत असे आलेमाव म्हणाले आहेत.

Close Matka Shops In Goa On Good Friday
Close Matka Shops In Goa On Good FridayDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com