Fire At Mapusa
करासवाडा, म्हापसा येथे सेंटॉर फार्मास्युटिकल कंपनीच्या प्रयोगशाळेला आग. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण.
यंदाच्या शैक्षणिक वर्ष (2024-25) इयत्ता नववीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार. शैक्षणिक मंडळाच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.
Colva Prostitution Case
कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला न्यायालयाने आज (शुक्रवारी) तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्या शिवाय त्याला दहा हजारांचा दंडही सुनावला आहे. तो न भरल्यास आरोपीला तीन महिन्यांची अतिरिक्त साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.
सांताक्रुज पंचायतीच्या सरपंच जेनिफर ऑलिवेरा यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव विरोधी गटातील पंच सदस्य बैठकीवेळी अनुपस्थित राहिल्याने बारगळला, त्यामुळे जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे.
मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी रविवारी 19 मे रोजी, जुने गोवा व इतर भागात सकाळी 07 ते दुपारी 03 पर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
Khorlim-Mapusa
खोर्ली-म्हापसा येथील गणपती मंदिराजवळील विहिरीत आढळला पुरुषाचा मृतदेह. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.
Pernem Murder Case
दाडाचावाडी धारगळ खून विषय सखोल चौकशी करावी अन्यथा लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला. आजगावकर यांनी पेडणे पोलीस ठाण्यात भेट घेतली व पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्याशी चर्चा केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.