"पंचायतमंत्री हुकूमशाही वृत्तीचे!" माविन गुदिन्हो यांच्या विधानावर अमित पालेकर कडाडले; ग्रामसभेच्या अधिकारांवरुन गोव्यात नवा वाद

amit palekar slams mauvin godinho: ग्रामसभेच्या अधिकारांबाबत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केलेल्या विधानावर काँग्रेस नेते अमित पालेकर यांनी टीका करत त्यांच्यावर ‘पूर्णपणे हुकूमशाही वृत्तीचे’ असल्याचा आरोप केला आहे.
amit palekar slams mauvin godinho
amit palekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ग्रामसभेच्या अधिकारांबाबत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केलेल्या विधानावर काँग्रेस नेते अमित पालेकर (Amit Palekar) यांनी टीका करत त्यांच्यावर ‘पूर्णपणे हुकूमशाही वृत्तीचे’ असल्याचा आरोप केला आहे.

सरकारी प्राधिकरणांकडून आधीच मंजुरी मिळालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना ग्रामसभा कसा विरोध करू शकते, असा प्रश्न मंत्री माविन गुदिन्हो यांनी उपस्थित केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पालेकर म्हणाले, स्थानिक समुदायांवर परिणाम करणारे निर्णय अन्यत्र घेतले जात असताना ग्रामसभेला केवळ ‘मूक प्रेक्षक’ बनवून ठेवता येणार नाही.

amit palekar slams mauvin godinho
Goa Crime News: 'ती' अवघ्या 15 वर्षांची! बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आलं भयानक सत्य, उत्तर प्रदेशच्या तरूणाला बेड्या

पंचायत राज कायद्यानुसार पंचायत व्यवस्था ही लोकांचे सक्षमीकरण करण्यासाठी आहे, अधिकार एकाच ठिकाणी केंद्रित करण्यासाठी नव्हे, असे नमूद करत त्यांनी मंत्र्यांनी पंचायतींवर दोषारोप करण्यापूर्वी स्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला. निवडून आलेल्या ग्रामपंचायती आणि ग्रामसभांना केवळ नाममात्र संस्था बनवले जात असून, नियोजनाचे वास्तविक अधिकार हळूहळू नोकरशाहीच्या विभागांकडे सोपवले जात आहेत, असा आरोपही पालेकर यांनी केला.

amit palekar slams mauvin godinho
Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

दरम्यान, गुदिन्हो यांनी म्हटले होते की, अर्जदारांनी सरकारी प्राधिकरणांकडून सर्व कायदेशीर परवानग्या आधीच मिळवल्या असतील, तर अशा प्रकल्पांवर ग्रामसभा आक्षेप कसा घेऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Velsao Villagers Delegation Meets South Goa Collector
Mavin Gudinho questions Congress over Jharkhand issue
Goa Housing Board Home Regularisation
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com