Goa: कुडचडेत रुग्णवाहिकेवरून घमासान

Goa: परवानगीच्‍या मुद्द्यावरून वातावरण तापले : काँग्रेस कार्यकर्त्‍यांनी शहरात काढली मिरवणूक
Goa: Congress workers with Ambulance.
Goa: Congress workers with Ambulance.Dainik Gomantak

कुडचडे : कुडचडेचे (Curcharem Goa) समाजसेवक अमित पाटकर यांनी कुडचडे, सांगे, केपे, सावर्डे भागातील जनतेला मोफत सेवा देण्यासाठी ४० लाख रुपये खर्चून सात जुलै रोजी सुसज्‍ज अशी रुग्णवाहिका आणली आहे. त्‍यांनी सर्व सोपस्‍कार पूर्ण करून रुग्‍णवाहिका (Ambulance Issue) आरोग्य खात्याकडे सुपूर्द करण्‍याची परवानगी मागितली. याला एक महिना पूर्ण होत आला तरीही या ना त्या कारणावरून परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्‍याच्‍या निषेधार्थ कुडचडे गट काँग्रेसने रुग्णवाहिका सोबत घेऊन शहरात मिरवणूक काढून थेट काकोडा-कुडचडे आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य अधिकारी मोहनराव देसाई यांना जाब विचारला. येत्‍या चार दिवसांत परवानगी न दिल्यास शेकडो कुडचडेतील नागरिकांना सोबत घेऊन उपोषणास बसण्याचा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

कुडचडेतील जनतेला मोफत सेवा देण्यासाठी अमित पाटकर यांनी सुसज्‍ज रुग्‍णवाहिका आणून आठ जुलै रोजी राजपत्रित नियमानुसार सर्व सोपस्कार पूर्ण केले. आरोग्य अधिकाऱ्यांनी संपूर्ण चाचणी घेतली, तरीही दर दिवशी काही ना काही अडचणी पुढे केल्या जाऊ लागल्या. कुडचडेतील जनतेचा संयम संपण्याआधी रुग्‍णवाहिका आरोग्‍य खात्‍याकडे सुपूर्द करण्‍यास परवानगी देण्याची मागणी या पूर्वी काँग्रेस पक्षाने केली होती, तरीही दुसऱ्यांदा रुग्णवाहिकेची चाचणी करणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले असता, गुरुवारी पुन्‍हा एकदा संपूर्ण तपासणी करण्‍यात आली. त्‍यावेळी रुग्णवाहिकेला वाहतूक खात्याने आर. सी. बूक दिले नसल्याचे निमित्त पुढे करण्‍यात आले. वास्तविक वाहनाचे आर. सी. बूक (स्मार्ट कार्ड) उशिरा देण्यात येत असतानाही आरोग्य अधिकारी आर. टी. ओ. प्रमाणे रुग्णवाहिकेची तपासणी करीत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतापले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्‍यांच्‍यावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची तपासणी करून अमित पाटकर यांनी आणलेल्या रुग्णवाहिकेइतक्या सोयी त्‍यात उपलब्ध आहेत काय याची तपासणी करण्याची मागणी केली.

Goa: Congress workers with Ambulance.
Tiger Anwar murder case: पुराव्यांअभावी दोघांची निर्दोष सुटका

यावेळी माजी नगरसेवक मनोहर नाईक म्हणाले, की डिझेल नाही, ड्रायव्‍हर नाही, मधेच गाडी बंद पडणे अशा सरकारी रुग्‍णवाहिकेच्‍या तक्रारी असताना सुसज्‍ज सेवा देऊ पाहणाऱ्या रुग्णवाहिकेला परवानगी का दिली जात नाही? मुद्दाम ही अडवणूक केली जात असून, कुडचडेवासीयांनी याचा विचार करण्याची गरज आहे.

मी काय गुन्‍हा केला का?

यावेळी अमित पाटकर म्हणाले, की केवळ राजकीय सूड उगवण्यासाठी स्थानिक आमदार आरोग्य खात्यावर दबाव आणून परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ज्या दिवशी रुग्णवाहिका आणली त्याच दिवशी कायदेशीर परवानगी न घेतल्यास दंड आणि दोन महिने कैद अशी शिक्षा देण्यात येईल, अशी नोटीस आरोग्य अधिकारी आपल्‍याला पाठवितात. याचा अर्थ आपण कुडचडेतील जनतेला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली हा गुन्हा केला काय? इतकेच नाही तर आरोग्य अधिकारी रुग्णवाहिका तपासणी वेळी रुग्णवाहिकेवर अमित पाटकर यांचे नाव का घातले, असा प्रश्न उपस्थित करतात. राज्यात जितक्या रुग्णवाहिका आणि शववाहिका चालतात त्यावर राजकारण्‍यांची नावे कशी काय मान्य केली जात आहेत, असा संतापजनक प्रश्न पाटकर यांनी करून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली.

Goa: Congress workers with Ambulance.
Goa Police: अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com