...तर महाराष्ट्रातील वाहने अडवू

गोवा सरकार अनेक क्षेत्रात बाहेरच्या लोकांना संधी देत आहे.
स्वयंपुर्ण गोवा चित्ररथ
स्वयंपुर्ण गोवा चित्ररथDainik Gomantak

पणजी: गोवा सरकार (Government of Goa) अनेक क्षेत्रात बाहेरच्या लोकांना संधी देत आहे. सरकारचे स्वयंपूर्ण गोवासाठी वापरलेले वाहन बाहेरचे आहे. भाजप सरकार (BJP Government) सत्तेत आल्यापासुन गोमंतकीयांचे हित न जपता गोवा परप्रांतीयांना विकण्याचेच काम करीत आहे. गोव्याचे अकार्यक्षम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तथाकथीत " स्वयंपुर्ण गोवा चित्ररथ" महाराष्ट्राच्या वाहनावर स्वार आहे. अशी टीका कॉंग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. आज एक पत्रक जारी करुन पणजीकर यांनी वरील टीका केली आहे.

भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी सिंधदूर्गला ऑक्सिजन पाठविण्यासाठी गोव्यात प्राणवायुची कमतरता करुन कोविड रुग्णांचे खुन केले. असा आरोप करून आज स्वयंपुर्ण गोव्याचे डिंडोरे पिटवीत फिरणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दोन चित्ररथांसाठी महाराष्ट्राची वाहने आणावी लागतात. यावरुन भाजपचे स्वयंपुर्ण गोवा अभियान फसल्याचे उघड होत आहे. गोव्यातील वाहने सदर चित्ररथासाठी का वापरण्यात आली नाहीत ? हे भाजपने स्पष्ट करावे अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

स्वयंपुर्ण गोवा चित्ररथ
Goa: पर्यटन व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी काणकोण पालिकेची एक खिडकी योजना

भाजपने गोव्यातील निवडणूकांसाठी महाराष्ट्राचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक केली आहे. आपली खुर्ची सांभाळण्यासाठीच व त्यांच्यावर "इंप्रेशन" मारण्यासाठी डॉ. प्रमोद सावंतानी महाराष्ट्राची वाहने आणली असावीत. असा दावा करून सरकारने ताबडतोब सदर चित्ररथासाठी वापरलेली वाहने परत पाठवुन गोमंतकीयांची वाहने घ्यावीत. कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सदर चित्ररथ रोखणार असल्याचा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी शेवटी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com