शोकाकुल वातावरणात अक्षया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मळकर्णे गावावर शोककळा : चुलतबंधूने दिला अग्नी
Akshaya Pawaskar
Akshaya PawaskarDainik Gomantak
Published on
Updated on

Akshaya Pawaskar एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व तथा कोरोना योद्धा डॉ. अक्षया पावस्कर यांच्या अकाली मृत्युमुळे संपूर्ण गोवा राज्य हादरले आहे. आज (गुरुवारी) त्यांच्या मूळ भिंडे-मळकर्णे गावात शोकाकुल वातावरणात चुलत बंधू रुद्रेश पावस्कर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी जमलेल्या शेकडो उपस्थितांनी साश्रूपूर्ण नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

Akshaya Pawaskar
Bicholim School News: डिचोली विद्यालय स्प्रे प्रकरणात मोठी कारवाई! 5 संशयित विद्यार्थी निलंबित

डॉ. अक्षया या जरी कोरोना योद्धा असल्या तरी त्या त्यांच्या कुटुंबासाठी खऱ्याखुऱ्या ‘फायटर’ होत्या. अनेक अडचणीच्या प्रसंगांना तोंड देत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली होती. वडील गेल्या पाच वर्षांपासून कोमा अवस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांना लक्ष द्यावे लागत असे.

त्यांची सुश्रुषा करण्यासाठी खास परिचारिका ठेवली होती. त्यांची मोठी बहीण अमेरिकेत, तर दुसरी मुंबईत असते. भाऊ नसल्याने डॉ. अक्षया याच आई-वडिलांच्या सेवेत होत्या. त्यांच्या अकाली मृत्युने पावस्कर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

Akshaya Pawaskar
Mapusa Municipality: मांस कचरा भरून खुल्या जागेत उभी केली कार; परिसरात दुर्गंधी पसरल्यावर पालिकेने केली कठोर कारवाई

व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठवणार

डॉ. अक्षया पावस्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यांच्यावर विषप्रयोग झाला का, मृत्यूचे अन्य कारण तपासण्यासाठी हा व्हिसेरा वेर्णातील फॉरेन्सिक लॅबला २-३ दिवसांत पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com