Goa Water Supply: 2047 पर्यंत गोवा पाणीपुरवठ्याचे लक्ष्य साध्य करणार, 100 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट: मंत्री शिरोडकरांची माहिती

Minister Subhash Shirodkar Water Plan: येत्या २०४७ पर्यंत गोवा पुरेशा पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करेल. सध्या १०० बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू असल्याने हे उद्दिष्ट साध्य होईल.
 Minister Subhash Shirodkar Water Plan
Minister Subhash Shirodkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sets Ambitious Goal for Sufficient Water Supply by 2047, Says Minister Subhash Shirodkar

म्हापसा: येत्या २०४७ पर्यंत गोवा पुरेशा पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य करेल. सध्या १०० बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू असल्याने हे उद्दिष्ट साध्य होईल. हे पाणी शेतीसाठी वापरता येईल, त्याशिवाय या पाण्याचा वापर हा विहिरींचे पुनर्भरण होण्यास लाभदायक ठरेल, असे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

उपसभापती तथा म्हापशाचे (Mapusa) आमदार जोशुआ डिसोझा यांच्या उपस्थितीत करासवाडा व धुळेर येथील प्रमुख नाल्यांची तसेच कुचेली झऱ्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नवीन जलवाहिनीमुळे २५० एमएलडी जास्त पाणी मिळेल, जे उत्तरेसाठी पुरेसे पाणी साठवणुकीसाठी वापरता येईल. याशिवाय भविष्यात, तिथे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देखील तरतूद करता येईल.

 Minister Subhash Shirodkar Water Plan
Goa Water Supply Department: भरपावसात कवळेतील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त; पाणी पुरवठा विभागाचा कामगिरी

पावसाळ्यात सखल भागातील शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने आम्ही प्रभाग तीन ते धुळेरपर्यंतच्या नाल्याची पाहणी केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) कामामुळे करासवाडा भागात पाणी साचले आहे. आम्ही चार ठिकाणांची पाहणी केली आहे. सामान्यतः म्हापसा नदीच्या बाजूला जास्त लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, यावेळी आम्ही या बाजूला लक्ष केंद्रित केले आहे. कारण पुराची समस्या आहे. याशिवाय, कुचेली झऱ्याची देखील पाहणी केली आहे. जी म्हापशातील सर्वात जुनी झर आहे. आकय ते धुळेर, कुचेली व शिवोलीपर्यंत पोहोचणाऱ्या मोठ्या नाल्याच्या पुनर्बांधणीचे काम सुमारे ५ कोटी खर्चाचे असेल, असे उपसभापती डिसोझा म्हणाले.

 Minister Subhash Shirodkar Water Plan
Goa Water Supply: गोव्यात जुन्या जलवाहिन्यांमुळे वाया जाते 38 टक्के पाणी

‘कुचेली झऱ्याचे संरक्षण व्हायला हवे’

कुचेली झरा सुंदर असून त्याचे संरक्षण आपण करायला हवे. यापूर्वी या झऱ्याचे पाणी घरे बांधण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी देखील केला जायचा. मात्र, सध्या पाण्याच्या बाजूने सांडपाणी वाहताना दिसते. झऱ्यात सांडपाण्याचे पाणी वाहून जाणे थांबवणे आवश्यक आहे. जे म्हापसा पालिकेद्वारे केले जाईल, असे उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com