Goa Agriculture Department
Goa Agriculture DepartmentDainik Gomantak

Panjim: रसायनमुक्त फळांसाठी पुढाकार! कृषी खातं म्हापशात उभारणार कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याचा कक्ष

Goa Agriculture Department: गोवा कृषी उत्पन्न व पशुधन बाजार समितीच्या म्हापसा येथील सब यार्डात कृत्रिमरीत्या फळ पिकवण्याचा कक्ष कृषी खाते सुरू करणार आहे.
Published on

पणजी: गोवा कृषी उत्पन्न व पशुधन बाजार समितीच्या म्हापसा येथील सब यार्डात कृत्रिमरीत्या फळ पिकवण्याचा कक्ष कृषी खाते सुरू करणार आहे. अलीकडे रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या फळे पिकविल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन खात्याने या बाजारावरील विक्रेत्यांवर छापे टाकून कारवाई केली होती. यानंतर कृषी खात्याने हा निर्णय घेतला आहे.

सर्व तालुक्यांत प्रत्येकी एक या पद्धतीने कृत्रिम फळे पिकवण्याचा कक्ष कृषी खाते सुरू करणार आहे. त्या कक्षात कोणतीही हानिकारक रसायने न वापरता पारंपरिक व आधुनिक पद्धतीच्या मिश्रणाने फळे पिकवण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे.

Goa Agriculture Department
Goa Government: अखेर अपमानास्‍पद हकालपट्टी! गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्‍चू, मुख्‍यमंत्र्यांवरील शिंतोडे पडले 'महागात'

विक्रेते शुल्क भरून त्या सुविधेचा वापर करू शकतील. म्हापसा येथील कक्ष येत्या गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न कृषी खाते करत आहे. म्हापशात ६० टन क्षमतेचा कृत्रिम फळपिकवणी कक्ष सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Goa Agriculture Department
Goa: डिजिटल क्रांतीकडे गोवा! 'हर घर फायबर' योजनेमुळे स्वप्न होतंय साकार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

उत्तर गोव्यात कृत्रिम फळपिकवणी कक्षाचा अभाव असल्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षणावर कृषी विभागाने तातडीने पावले उचलत म्हापसा बाजार परिसरात दररोज ६० टन क्षमतेचा आधुनिक फळपिकवणी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.

येत्या गणेश चतुर्थीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिली. यासाठी ई-निविदा काढण्यात आली असून सध्या काम वेगाने सुरू आहे.

केंद्राचा ३५ टक्के निधी

सध्या म्हापसा बाजारात दररोज ८ ते १० टन केळी येतात, तर सणासुदीच्या काळात ही मात्रा १५ टनांवर जाते. हे लक्षात घेता १५ टन क्षमतेचे चार स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहेत. सुमारे २ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ३५ टक्के निधी देणार असून उर्वरित खर्च राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com