Goa Agriculture : खरीप हंगाम फुलणार; कृषी विभाग आशावादी

Goa Agriculture : शेतकऱ्यांचा प्रतिसाद : गोवा कृषी बाजार, गोवा बागायतदारकडून बियाणी उपलब्ध
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

योगेश मिराशी

Goa Agriculture :

म्हापसा, यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीखालील क्षेत्रात वाढ अपेक्षित असून, उत्पादनातही वाढ होईल. परिणामी, भाताच्या लागवडीत यावर्षी वाढ होण्याबाबत कृषी विभागीय कार्यालय आशावादी आहे.

शेतकऱ्यांना भाताची बियाणी उपलब्ध करून देणाऱ्या म्हापशातील गोवा कृषी बाजारतर्फे आतापर्यंत सरासरी सुमारे विविध प्रकारच्या बियाण्याचे ८० टन भात उपलब्ध केले आहे. यंदाचा हंगाम तसेच शेतकऱ्यांची मागणी पाहता, अतिरिक्त बियाण्यांचा साठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची तयारीही ठेवली आहे.

बार्देशातील अनेक भागांतील पडिक जमिनी मागील दोन वर्षांत लागवडीखाली आणल्या होत्या. यात हळदोणा, पर्रा, नागवा, हडफडे या परिसरातील शेतजमिनींचा समावेश आहे. त्यात अजून काही गावांचा भर पडू शकते.

Goa Agriculture
Goa: गोव्यातील फार्मा कंपन्यांसाठी पुणे, मुंबईत मुलाखती घेण्यावरुन वाद का झाला? विरोधकांनी उठवले रान

शेतकऱ्यांना कृषी विभागीय कार्यालयाव्यतिरिक्त गोवा कृषी बाजार तसेच गोवा बागायतदार या संस्थांकडून मागणीनुसार विविध जातीची बियाणी पुरविली जातात. कृषी विभागीय कार्यालयात इतर जातीची बियाणी उपलब्ध केली जातात, तर इतर दोन ठिकाणी ज्योती जातीच्या बियाण्यांना मागणी असते.

काही शेतकरी आगाऊ नोंदणी करून नंतर बियाणी नेतात. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून विक्रीची सुरवात केली जाते. यंदा आगाऊ नोंदणीची वाट न बघता विक्रीसाठी आणलेल्या बियाण्यांची खरेदी करण्यावर शेतकऱ्यांकडून भर देण्यात आला. इतरांच्या तुलनेत कृषी बाजारकडून बियाण्यांची सर्वात जास्त विक्री केली जाते. दरवर्षी सरासरीवर सुमारे १२५ टन बियाण्यांची विक्री तालुक्यातून केली जाते. गेल्या दोन वर्षांत हे प्रमाण सरासरी १३० टन होते. यावर्षी बियाण्यांच्या विक्रीचे प्रमाण १४० टनाहून जास्त होण्याची शक्यता आहे.

Goa Agriculture
Goa Police: तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांच्या तपासाला मिळेल गती; नव्या फौजदारी कायद्यांबाबत पणजीत पत्रकारांसाठी कार्यशाळा

३२ ट्रॅक्टर्सद्वारे शेतनांगरणी

१ सध्या बार्देशात शेतनांगरणीला जोर आला आहे. दरवर्षी ४ हजार हेक्टर शेतीची नांगरणी केली जाते. यंदा शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी मिळणारा प्रतिसाद पाहता त्यात वाढ होणार, असा विश्वास यांत्रिकी विभागाकडून व्यक्त केला आहे. तालुक्यातील कृषी विभागीय कार्यालयाच्या यांत्रिकी विभागाकडून शेतनांगरणीला सुरवात केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे काम सुरू झाले आहे.

२ विभागीय कार्यालयातील पाच तसेच सेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या मिळून ३२ ट्रॅक्टर्सचा वापर बार्देश तालुक्यात शेतनांगरणीसाठी केला जातो. नांगरणीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागीय कार्यालयाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. प्रारंभी खाजन शेतीतील नांगरणी हाती घेतली आहे. हळदोणा, थिवी तसेच पर्वरीत खाजन शेतीचे प्रमाण अधिक असल्याने तेथील कामाला प्राधान्य दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com