दाबोळी : होळांत-बोगमाळो (volant bogmalo) परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली सुरू असल्याची स्थानिकांनी दिलेली माहिती पोलिसांच्या (Goa police) उपयोगी पडली आणि अमर नाईक (amar naik) याच्या खून प्रकरणातील (murdur case) शैलेश गुप्ता आणि शिवम सिंह या दोघा संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले. (two suspects arrested) पोलिसांनी कासावली रेल्वे स्थानकात (cansavolim rail way station) दडून बसलेल्या आणि वेग मंदावलेल्या मालगाडीला लटकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा संशयितांच्या मुसक्या क्षणाचाही विलंब न करता आवळल्या आणि या खून प्रकरणाचा छडा १२ तासांत लावला.
बोगमाळो येथे गुरुवारी ही घटना घडल्यानंतर परिसराची पोलिसांनी नाकाबंदी केली होती. (blockade) त्यामुळे संशयित पसार झाले नाहीत, याविषयी पोलिसांना खात्री होती. दाटलेला अंधार आणि अविरतपणे पडणारा पाऊस यामुळे तपासाला मर्यादा येत होती. तरीही रात्रभर तपास पथकांतील पोलिसांनी डोळ्याला डोळा लावला नाही आणि पहाटेच्या दरम्यान मोहीम फत्ते केली. याबद्दल पोलिसांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (cm dr. pramod sawant) आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (heath minister vishwajit rane) आदींनी अभिनंदन केले आहे.
वास्को (vasco) परिसरातून निघणाऱ्या मालगाड्या पहाटे येणाऱ्या प्रवासी रेल्वेना बाजू देण्यासाठी वास्को ते कासावलीदरम्यान थांबवल्या जातात, याची माहिती पोलिसांना होती. संशयित होळांत परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान टिपले गेल्यानंतर ते जवळच असलेल्या लोहमार्गाचा उपयोग पळण्यासाठी करणार, याची कल्पना पोलिसांना आली होती. त्यामुळेच मालगाडीवर पोलिसांची नजर होती. अखेर कासावली रेल्वे स्थानक परिसरात मालगाडीला लटकण्यासाठी आलेल्या त्या दोघा संशयितांना पोलिसांनी पकडले. संशयितांनी अमर याच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे असून तपासासाठी सात दिवस पोलिस कोठडीचा रिमांड घेण्यात आला आहे. (under police custudy)
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज सिंह यांनी तपासकामाचे नेतृत्व केले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ते पोलिसांसोबत तपासकामात सहभागी झाले होते. त्यांनी आज (शुक्रवारी) कार भाड्याने देणारा व्यावसायिक, हॉटेलचालक आणि दोघे संशयित यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अमर याच्यासोबत काल उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राकडूनही त्यांनी माहिती घेतली. शुक्रवारी रात्रीपर्यंत हा खून का झाला, या मुद्यावर पोलिस तपास पोचला असून या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी कारचा फॉरेन्सिक पंचनामा केला असून पुरावे गोळा केले आहेत. गाडीतील ठसेही मिळवण्यात आले आहेत. झाडलेल्या गोळ्या आणि रिकाम्या पुंगळ्याही गाडीतच सापडल्या. असे असले तरी गोळ्या झाडण्यासाठी वापरलेले पिस्तुल अद्याप हस्तगत करता आलेले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.