Goa AAP: 'गोवा पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव, कायदा आणि सुव्यवस्था ढासळली'; आप नेत्यांचा आरोप

Goa Politics: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांना जबाबदार धरायला हवं', असे कुएल्हो म्हणाले.
AAP leaders allege political interference in Goa police
Goa AAPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली काम करतायेत, असा आरोप आप नेते फ्रान्सिस कुएल्हो यांनी केला. अनेक प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास दिरंगाई केली, या प्रकरणात पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव होता, असे कुएल्हो म्हणाले. दुसरीकडे सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाते असेही कुएल्हो यांनी नमूद केले.

फ्रान्सिस कुएल्हो यांनी गुरुवारी (१७ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'खाजने पेडणेत आंबडेकर जयंती दिवशी एका अल्पवयीन मुलीचा मारहाण करुन विनयभंग करण्यात आला. वाळपईत एका २४ वर्षीय तरुणाचा खून झाला तसेच, सांगेत काही जणांनी घरात घुसून एकाला मारहाण केली, या प्रकरणात चौकशी केली असता पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव असल्याचे दिसून येते', असा आरोप आप नेते फ्रान्सिस कुएल्हो यांनी केला.

AAP leaders allege political interference in Goa police
Belgaum Crime: दारुच्या नशेत शिवीगाळ करत अंध आईकडे जेवण मागितले, मोठ्या भावाने लहान भावाला संपवले

'रामा काणकोणकरांवर वक्तव्य केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी स्वत: गुन्हा नोंद करुन दुसऱ्या दिवशी अटक केली. गोविंद गावडे यांच्यावर देखील टीका करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली. पण, वाळपईत झालेल्या खून प्रकरणातील आरोप अद्याप का सापडत नाही पोलिसांना? असा सवाल आम आदमी पक्षाने उपस्थित केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांना जबाबदार धरायला हवं', असे कुएल्हो म्हणाले.

श्रवण बर्वेला न्याय मिळायला हवा

नगरगाव, वाळपई येथे २४ वर्षीय श्रवण बर्वेचा गळा दाबून खून करण्यात आला. एका गोमंतकीय तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांना याप्रकरणातील खुनी अद्याप सापडलेला नाही. श्रवण बर्वेला न्याय मिळायलाच हवा, त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, असे आप नेते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com