Goa Accident Death: टॅक्सी चालवताना लागला डोळा; पर्रा येथील अपघातात म्हापशाच्या टॅक्सीचालकाचा मृत्यू

राज्यात दोन अपघातात 2 मृत्यू; पांझरखण-कुंकळ्‍ळीमधील अपघातातही तरूण ठार
Goa Accident Death: टॅक्सी चालवताना लागला डोळा; पर्रा येथील अपघातात म्हापशाच्या टॅक्सीचालकाचा मृत्यू

Goa Accident Death: सध्या गोव्यातील वाढते अपघात हे चिंतेचे कारण बनले आहे. अशातच पर्रा-साळगाव रस्त्यावर झालेल्या स्वयंअपघातात टॅक्सीचालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी (ता. 20) पहाटे 5 वा.च्या सुमारास पर्रा-साळगाव रस्त्यावर घडली.

ताहीर खान (28, गंगानगर-खोर्ली, म्हापसा) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो साळगावहून म्हापशाच्या दिशेने येत होता. ताहीर सांगोल्डामध्ये टॅक्सीचालक म्हणून कामाला होता व पहाटे कामावरून तो घरी परतत असताना ही घटना घडली.

Goa Accident Death: टॅक्सी चालवताना लागला डोळा; पर्रा येथील अपघातात म्हापशाच्या टॅक्सीचालकाचा मृत्यू
गोव्यात अजुनही तब्बल 600 बसेसचा तुटवडा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण...

पावसाची रिपरिप तसेच डोळा लागल्याने कदाचित ताहीरचे गाडीवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याबाजूला असलेल्या गटारात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असे प्रथमदर्शनी पोलिसांना वाटते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. म्हापसा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला.

पांझरखण-कुंकळ्‍ळी अपघात

फातर्पा येथे आपल्या एका नातेवाईकाकडे भेट देऊन परतत असताना झालेल्या रस्ता अपघातात सां जुझे दी आरियाल येथील ब्रॅण्डन वाझ हा २८ वर्षीय युवक ठार झाला. पांझरखण-कुंकळ्‍ळी येथे रविवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला.

Goa Accident Death: टॅक्सी चालवताना लागला डोळा; पर्रा येथील अपघातात म्हापशाच्या टॅक्सीचालकाचा मृत्यू
Narendra Modi Net Worth: नरेंद्र मोदींकडे किती संपत्ती आहे? पंतप्रधान म्हणून त्यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या सविस्तर

कुंकळ्‍ळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रॅण्डन वाझ हा आपल्या एका नातेवाईकाला भेट देण्यासाठी फातर्पा येथे आला होता. यानंतर तो आपल्या सां जुझे दी आरियल येथील घरी परतत असताना पांझरखण-कुंकळ्‍ळी येथील महामार्गावर असलेल्या ‘रंबेल्स’वर त्याचा दुचाकीवरील तोल गेला व तो खाली कोसळला.

डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात नेण्यात आले. मात्र, उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत व हवालदार विनोद काणकोणकर यांनी पोलिस सोपस्कार पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com