Goa Pregnancy Termination: 5 वर्षांत राज्यात 9627 जणींचे गर्भपात, रोज सरासरी पाच केसेस; केंद्रीय मंत्री पटेल यांची माहिती

Goa Abortion Statistics: राज्‍यसभा खासदार ए.ए. रहीम यांनी याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. गोव्‍यासह देशभरात गेल्‍या पाच वर्षांत किती गर्भपात झालेले आहेत, असा प्रश्‍न रहीम यांनी विचारला होता.
Goa abortion statistics
Goa abortion statisticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्‍या पाच वर्षांत राज्यातील गर्भपाताच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्‍येक दिवशी राज्‍यात सरासरी पाच महिलांचे गर्भपात होत असल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

राज्‍यसभा खासदार ए.ए. रहीम यांनी याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. गोव्‍यासह देशभरात गेल्‍या पाच वर्षांत किती गर्भपात झालेले आहेत, असा प्रश्‍न रहीम यांनी विचारला होता. त्‍यावर मंत्री पटेल यांनी सादर केलेल्‍या उत्तरातील आकडेवारीनुसार, गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यात एकूण ९,६२७ जणींचे गर्भपात झाले असून, त्‍यात दरवर्षी वाढच होत गेल्‍याचे दिसून येते. गोव्‍यासह इतर ३६ राज्‍यांची आकडेवारी पाहिल्‍यास प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये गर्भपात वाढत असल्‍याचेही स्‍पष्‍ट होते.

प्रत्‍येक राज्‍यामध्‍ये सुरक्षित गर्भपातासाठी किती सार्वजनिक आरोग्‍य केंद्रांमध्‍ये सुसज्ज व्‍यवस्‍था उभारण्‍यात आली आहे, असाही प्रश्‍न रहीम यांनी केला होता. त्‍यावर गोव्‍यात पाच ठिकाणी अशी अधिकृत व्‍यवस्‍था असल्‍याचे मंत्री पटेल यांनी म्‍हटले. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी वेळेवर, सुरक्षित आणि परवडऱ्या दरांत गर्भपाताची व्‍यवस्‍था करून देण्‍यासाठी सरकारांनी कोणकोणत्‍या उपाययोजना केल्‍या आहेत.

Goa abortion statistics
Goa Crime: लैंगिक अत्याचारानंतर करायला लावत होता गर्भपात, अखेर लग्नास होकार दिल्याने कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

या प्रश्‍नावर, एससी, एसटी आणि इतर दुर्बल घटकांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि परवडणाऱ्या दरांत गर्भपाताची व्‍यवस्‍था करून देण्‍यासाठी केंद्र सरकारने देशभर सर्वसमावेशक गर्भपात काळजी कार्यक्रम (सीएसी) राबवण्‍यात येत आहे. यासाठी राज्‍यांना प्रत्‍येक वर्षी अर्थसहाय्य देण्‍यात येते. सुरक्षित गर्भपातासाठी आवश्यक उपकरणे आणि औषधांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्‍यात येत असून, समाजात जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येत आहे. दरवर्षी देशभर आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन साजरा केला जात असल्‍याचेही मंत्री पटेल यांनी नमूद केले आहे.

Goa abortion statistics
Giorgia Meloni: ‘’बार टेंडर म्हणून काम केलं, आईला गर्भपात करायचा होता...’’

गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यात झालेले गर्भपात

वर्ष गर्भपात

२०२०-२१ ७७१

२०२१-२२ १,०६८

२०२२-२३ २,०८८

२०२३-२४ २,५९३

२०२४-२५ ३,१०७

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com