Manish Jadhav
“राजकारण ही केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे” हा समज मोडून जॉर्जिया मेलोनी 2022 मध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. मेलोनी यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनून इतिहास रचला.
मेलोनी यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी मंत्री बनून इतिहासात आपले नाव नोंदवले. पण अनेक विक्रम आपल्या नावावर असलेल्या मेलोनी यांचे आयुष्य संघर्षमय राहिले.
पीएम मेलोनी यांचा पक्ष स्थापन करण्यापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास खूप अडचणींनी भरलेला राहिला. परंतु त्या संघर्षात बिलकुल डगमगल्या नाहीत.
जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म 1977 मध्ये इटलीची राजधानी रोममधील गरबाटेला येथे झाला. मेलोनी यांच्या राजकीय जीवनाबद्दल सर्वांना माहिती आहे, परंतु त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.
गेल्या वर्षी जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसणाऱ्या गोष्टी जगासमोर मांडल्या.
मेलोनी यांनी सुरुवातीस बार टेंडर म्हणून काम केले. प्रत्येक अडचणीवर मात करत त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
मेलोनी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले की, या जगात त्यांचा जन्म होणे ही काही सामान्य गोष्ट नव्हती. खरं तर, त्यांच्या आईला गर्भपात करायचा होता. शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने आपला निर्णय बदलला होता.
जॉर्जिया मेलोनी यांची राजकीय कारकीर्द 1992 मध्ये सुरु झाली. मेलोनी अवघ्या 29 व्या वर्षी खासदार झाल्या. 2006 मध्ये त्या संसदेत पोहोचल्या. अवघ्या दोन वर्षांनंतरच त्या इटलीतील सर्वात तरुण मंत्री बनल्या.