भाजपकडून खाण अवलंबितांना खोटी आश्‍वासने: पालेकर

दिग्गज नेत्यांची खोटी आश्वासने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अपयश लपवू शकत नाहीत
BJP gives false assurances to goa mining dependents statment by amit Palekar
BJP gives false assurances to goa mining dependents statment by amit Palekar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची खोटी आश्वासने प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अपयश लपवू शकत नाहीत, असे म्हणत आम आदमी पक्षाचे उमेदवार अमित पालेकर यांनी खाण अवलंबितांना खोटी आश्वासने दिल्याबद्दल भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे. (BJP gives false assurances to goa mining dependents statment by amit Palekar)

BJP gives false assurances to goa mining dependents statment by amit Palekar
अरविंद केजरीवाल आजपासून गोवा दौऱ्यावर

नुकत्याच झालेल्या गोव्याच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) म्हणाले, गोव्यातील खनिजाचे विधानसभा निवडणुकीनंतर पारदर्शक लिलाव प्रक्रियेसह पुन्हा कार्यान्वित केला जाईल. भाजपने राज्यात दहा वर्षे राज्य केले आहे. मग राज्यातील खाणकाम सुरू करण्यापासून भाजप सरकारला कोणी रोखले? असे शहा याच्या आश्वासनावर प्रतिक्रिया देताना पालेकर (Amit Palekar) म्हणाले.

भाजप (Goa BJP) सरकार अकार्यक्षम असून निःस्वार्थी हेतूने कोणतेही काम करत नाही, असा दावा पालेकर यांनी केला. खोटी आश्वासने देऊन गोवेकरांना मूर्ख बनवणे बंद करा, असे ते म्हणाले.

दिल्लीतील ‘आप’ (Goa AAP) सरकारने काम केले असेल, तर लोकांनी मतदान करावे, असे सांगण्याचे धाडस दाखवले होते. पण भाजपमध्ये ही हिंमत नाही, कारण त्यांनी कोणतेही काम केले नाही. त्यामुळे अशी माहिती पसरवण्यासाठी इतर राज्यातून वरिष्ठ नेत्यांना गोव्यात बोलावावे लागत असल्याची टीका त्यांनीही पालेकरांनी केली.

भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांना गोवेकर बळी पडणार नाही, याची खात्री करा. पक्षाने काही काम केले असेल तरच मतदान करा, असे सांगण्याचे धाडस केवळ ''आप'' करते असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com