इंधन दरवाढीविरोधात आप नेत्यांचे मडगाव नगरपालिकेसमोर आंदोलन

सामान्य लोकांनी महागाईचा सामना कसा करायचा? आपचा सरकारला प्रश्न
Protest
Protest Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: इंधन आणि एलपीजी दरवाढीच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने बुधवारी मडगाव येथे सारकरच्या विरोधान आंदोलन केले. सरकारने इंधन दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, या मागणीसह अनेक आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. (Goa AAP leaders protest against hiked fuel prices in front of Margao municipal council)

Protest
...तर राज्यात कोरोनाच्‍या चौथ्या लाटेची शक्‍यता

बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांच्यासह आप नेत्यांनी मडगाव नगरपालिकेच्या बागेत बॅनर उंचावत घोषणाबाजी केली. त्याचबरोबर भाजप सरकारवर टीका देखील केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना, आप नेत्या फर्नांडिस म्हणाल्या, “गोवा डेअरीने अलीकडेच दुधाच्या दरात 4 रुपये प्रति लिटर वाढ केली आहे, घरगुती LPG गॅस सिलिंडरची किंमत 1,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. कोरोना महामारीत अनेक लोकांनी नोकऱ्या गामावल्या आहेत." सामान्य लोकांनी महागाईचा सामना कसा करायचा? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

Protest
...म्हणून मडगाव पालिकेत प्रशासकीय खोळंबा

आपचे उपाध्यक्ष सुरेल तिळवे म्हणाले की, "आम्ही लोकांना आधीच सावध केले होते की राज्यात भाजप सरकार आले तर महागाई वाढणार. अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि एचआयव्ही ग्रस्त लोकांना गेल्या चार महिन्यांपासून सरकारकडून आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यापैकी बरेच जण पूर्णपणे सरकारच्या मदतीवर अवलंबून आहेत. मात्र, भाजप सरकार आपल्या कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च करण्यात व्यस्त आहे." विरोधी पक्षात असताना महागाईचा निषेध करणाऱ्या स्मृती इराणींसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींबाबत मौनावरही आपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com