Banastarim Accident Case: आप नेते अमित पालेकर फरार? जामीन रद्द झाल्यानंतर अटकेची टांगती तलवार, गुन्हे शाखेकडून शोध

Amit Palekar: कोर्टाच्या निर्णयानंतर गुन्हे शाखेकडून पालेकरांच्या अटकेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
Banastarim Accident Case: आप नेते अमित पालेकर फरार? जामीन रद्द झाल्यानंतर अटकेची टांगती तलवार, गुन्हे शाखेकडून शोध
Amit Palekar Dainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Accident Case

पणजी: बाणस्तारी अपघात प्रकरणातील संशयित अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. जामीन रद्द झाल्यानंतर पालेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. गुन्हे शाखेकडून पालेकरांचा शोध सुरु असून, त्यांचा घरी शोध घेतला असता ते सापडले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी बाणस्तारी येथे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात संशयित असणाऱ्या अमित पालेकर यांचा जामीन फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द करण्यात आला आहे. पाटकर यांचा जामीन रद्द झाल्याने त्यांना केव्हाही अटक होऊ शकते.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमित पालेकर यांना तात्काळ आत्मसमर्पण करावे लागेल अन्यथा न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना अटक केली जाईल.

कोर्टाच्या निर्णयानंतर गुन्हे शाखेकडून पालेकरांच्या अटकेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. गुन्हे शाखेने पालेकरांच्या घरी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

Banastarim Accident Case: आप नेते अमित पालेकर फरार? जामीन रद्द झाल्यानंतर अटकेची टांगती तलवार, गुन्हे शाखेकडून शोध
'फडणवीस बॅगा घेऊन जाण्यासाठी गोव्यात आले होते, लोकशाहीची हत्या करण्यात त्यांची Phd; गोवा काँग्रेस

क्राइम ब्रँचने गेल्या आठवड्यात अमित पालेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आप नेते अमित पालेकर यांच्या वकिलाने सांगितले की, न्यायालयाने परदेशात जाण्याची परवानगी दिली असून फ्रान्सच्या प्रवासावर बंदी घातलेली नाही.

सोमवारी न्यायालयाने गुन्हे शाखेचा अर्ज स्वीकारत अमित पालेकर यांना दिलेला सशर्त जामीन रद्द केला.

गेल्यावर्षी 6 ऑगस्ट रोजी, बाणस्तारी पुलावर वेगवान मर्सिडीज कारने अनेक वाहनांना धडक दिली, यात तीन लोक ठार झाले तर तीन ते चारजण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी मुख्य संशयित आरोपी परेश सावर्डेकर याला वाचवण्यासाठी पुराव्याशी छेडछाड आणि दुसरा वाहनचालक हजर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अमित पालेकर यांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com