पणजी: 'पक्षांतराचे मास्टर देवेंद्र फडणवीस यांना गोव्यातून येऊन काँग्रेसवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी लोकशाही आणि संविधानाची हत्या करण्यात Phd मिळवली आहे. फडणवीसांनीच महाराष्ट्रात पक्ष फोडले.'
'फडणवीस पायाभरणीसाठी आले होते का हिशोब घेण्यासाठी आले होते? येत्या निवडणुकीत त्यांना बॅगांची गरज आहे त्यासाठीच ते गोव्यात आले होते', अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
राज्यघटनेच्या रक्षणाचा आव आणणारा कॉंग्रेस पक्ष प्रत्यक्षात फुटीरतावाद्यांसोबत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात केली होती. भाजपच्या मुख्यालयाची कदंब पठारावर पायाभरणी करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात फडणवीसांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
'फडणवीसांच्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. लोकशाहीचा खून कोणी केला असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना, राष्ट्रवादी कोणी फोडली याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे. सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान मोदी आणि फडणवीस करतात. त्याच माणसाला सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री करतात?'
'फडणवीसांचा पायगुण चांगला नाही. त्यांनी पक्ष फोडले याचे उत्तर लोकांनी त्यांना लोकसभेत दिले. २४ वरुन त्यांचे ९ खासदारच फक्त निवडून आले', असे पाटकर म्हणाले.
मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्याचप्रमाणे महायुती देखील येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातून नष्ट होईल, असे अमित पाटकर म्हणाले.
फडणवीसांचा पायगुण चांगला नाही. त्यांनी पक्ष फोडले याचे उत्तर लोकांनी त्यांना लोकसभेत दिले. २४ वरुन त्यांचे ९ खासदारच फक्त निवडून आले, असे पाटकर म्हणाले.
गोव्यात आठ आमदारांनी महालक्ष्मीच्या मंदिरात पक्षांतर करणार नाही अशी शपथ घेतली. त्या आमदारांना कसे फोडले ते त्यांनी सांगावे. फडणवीसांना विरोधक देश फोडण्याचा प्रयत्न करतायेत, असे बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांपासून देशात लोकशाही टीकवून ठेवली. गेल्या दहा वर्षात देशात कशाप्रकारे हुकूमशाही सुरु आहे हे आपण पाहिले, असे पाटकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस गोव्यात पक्षाच्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यासाठी आले होते का? गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या तिकीटांचा हिशोब घेण्यासाठी आले होते ते पहावं. कदाचित ते हिशोब घेण्यासाठी आले असावेत आता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना बॅगांची गरज आहे. त्याच कारणासाठी ते गोव्यात आले होते, असा शब्दात पाटकरांनी टीका केली.
संविधानाचा आदर न करणारे तसेच लोकशाहीवर विश्वास न ठेवणारेच लोक लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत, असे पाटकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.