
अरविंद केजरीवाल यांचे गोमंतकीय शिलेदार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. केजरीवालांच्या प्रचाराला अधिक बळकटी देण्यासाठी आमदार क्रूझ सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली गोवा आपचे एक शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले आहे. त्यामुळे आता गोव्यातील आप नेत्यांची तोफ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धडाडणार हे नक्की. केजरीवाल हॅट्ट्रिक लगावण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. केजरीवालांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपने मोर्चा खोलला आहे. खासकरुन इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसची जहरी टीका केजरीवालांना चांगलीच बोचत आहे.
दरम्यान, गोवा आप नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील स्वखर्चाने दिल्लीत पोहोचले आहेत. तर काही कार्यकर्ते आगोदरच दिल्लीतील (Delhi) आप कार्यकर्त्यांबरोबर ग्राऊंडवर काम करत आहेत. दिल्ली आपच्या नेत्यांनी गोवा टीमला विशिष्ट कामे आणि मतदारसंघ नियुक्त करुन दिले आहेत, जेणेकरुन तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत ते प्रचार मोहिमेचे नेतृत्व करतील.
आमदार वेंझी व्हिएगस यांच्या नेतृत्वाखालील गोवा आप नेत्यांची दुसरी टीम येत्या काही दिवसांतच दिल्ली मोहिमेत सामील होणार आहे, ज्यामुळे पक्षाच्या प्रचाराला डबल बळ मिळेल. दरम्यान, गोवा (Goa) आपचे कार्यकारी अध्यक्ष गर्सन गोम्स यांनी गोव्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यासोबत दिल्लीत एक मजबूत आणि चपळ कार्यकर्त्यांची फौज पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.