Goa Politics: गुडलरवरची कारवाई सेटिंग बिघडल्याने, दिवसाला एका महिलेवर अत्याचार; वाढत्या गुन्हेगारीमुळे आपचे सरकारवर टीकास्त्र

Goa AAP: पोलिस गस्त घालतात व पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. सरकार पोलिसांवर वचक ठेवण्यात कमी पडत आहेत, असा आरोप रॉड्रिगीस यांनी केला.
Goa AAP PC, Goa Political News
Goa AAP PCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍न उपस्थित करणारे प्रकार राज्यात घडत आहेत. चोरी, भ्रष्टाचार, ड्रग्ज प्रकरणे समोर येत असून सरकार यावर नियंत्रण आणण्यास असमर्थ ठरत असून पोलिस यंत्रणा राजकीय हस्तक्षेपामुळे अकार्यक्षम झाली असल्याचा आरोप आपचे नेते फ्रान्सिस कुएलो यांनी केला आहे.

आम आदमी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आपच्या सीसील रॉड्रिगीस, संदेश तळेकर व सलमान खान उपस्थित होते. कुएलो म्हणाले की, २०२३ नंतर एनसीआरबीने राज्यावर गुन्ह्यांची आकडेवारीच जाहीर केलेली नाही. परंतु मागील काही वर्षांतील जर राज्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर राज्यातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत.

गुडलरवर कारवाई सेटिंग बिघडल्याने?

काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. अकस्मित सरकारला जाग आली की, हे अधिकारी एकाच ठिकाणी मागील पंधरा वर्षांपासून आहेत. काही पोलिस तर सरळ सांगतात की, आपल्या विरोधात कसल्याही प्रकारची कारवाई होणार नाही कारण आपल्यावर राजकीय वरदहस्त आहे. सुनील गुडलरवर जी कारवाई करण्यात आली ही कोणाबरोबर असलेले सेटिंग बिघडल्याने...? यावरही विचार व्हायला हवा, असे संदेश तळेकर यांनी सांगितले.

Goa AAP PC, Goa Political News
Goa Politics: गुजरात गमावण्याच्या भीतीमुळेच हेराल्ड प्रकरणाची रणनीती, ED चा गैरवापर; चोडणकरांचा भाजपावर घणाघात

पोलिस यंत्रणा कुचकामी

ताळगाव येथे दिवसेंदिवस चोरीचे प्रकार वाढत आहेत. चोरी करून सीसीटीव्हीचा डिव्हीआर देखील पळवून नेले आहेत. चोरांनाही कळून चुकले आहे की पोलिस या भागात गस्त घालत नाहीत. ज्यावेळी असे प्रकार घडतात त्यानंतर काही काळ पोलिस गस्त घालतात व पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. सरकार पोलिसांवर वचक ठेवण्यात कमी पडत आहेत, असा आरोप रॉड्रिगीस यांनी केला.

Goa AAP PC, Goa Political News
Goa Crime: 12 लाखांच्या दागिन्यांसह बायको प्रियकरासोबत फरार, नवऱ्याने केली तक्रार; केरळमधील प्रेमी गोव्यात जेरबंद

थोडक्यात महत्त्वाचे

२०२४ मध्ये १०६ बलात्कार, २९ खून, २० खुनाचे प्रयत्न, ३ दरोडे, १३ घरफोडीची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

२०२४ साली ८५ किलो अमली पदार्थ जप्त केले ज्यात १२ लाख किमतीचे जीएचबी हे डेट रेप ड्रग जप्त करण्यात आले.

२०२३ साली महिलांवर अत्याचाराच्या २८८ घटना नोंदविण्यात आल्या होत्या. ज्यात वाढ होऊन २०२४ साली ३६५ घटना घडल्या म्हणजेच दिवसाला एका महिलेवर अत्याचार होत आहेत.

जमीन हडप प्रकरणी ७०८ तक्रारी आल्या होत्या परंतु केवळ ४७ तक्रारीची एफआयआर नोंद करण्यात आली.

राज्यात वर्षभरात ५६ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले परंतु यापैकी केवळ ३५ टक्के प्रकरणांत तक्रारदारांना न्याय मिळाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com