AAP Goa: गोव्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात 'आप'कडून लोकसभा उमेदवाराची घोषणा

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाने दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर, आता आम आदमी पक्षाच्या वतीने देखील दक्षिण गोव्यात उमेदवाराची घोषणा केलीय.
AAP Goa
AAP GoaDainik Gomantak

AAP Goa Loksabha Candidate

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. गोव्यात भाजप, काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्ष त्यांची ताकद आजमावत आहेत.

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाने दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर, आता आम आदमी पक्षाच्या वतीने देखील दक्षिण गोव्यात उमेदवाराची घोषणा केलीय.

आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दक्षिण गोव्यासाठी पक्षासाठी उमेदवाराची घोषणा केली आहे. बाणावलीचे आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस यांना दक्षिणेतून उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाला स्वच्छ आणि प्रमाणिक चेहरा उमेदवारीसाठी हवा असल्याचे वक्तव्य पाटकर यांनी यावेळी केले. तसेच, आप इंडिया आघाडीसोबत असल्याचे देखील पालेकर यांनी यावेळी सांगितले.

इंडिया आघाडीसोबत असल्याचा दावा करत आपने उमेदवाराची घोषणा केल्याने आघाडीतील समन्वयाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

AAP Goa
AAP Goa: लोकसभा निवडणुकीपूर्वी आपची गोव्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, 27 सदस्यांची यादी जाहीर

आम आदमी पक्षाने उत्तर गोव्यात आपला उमेदवार जाहीर केला असता तर आनंद झाला असता. दक्षिणेतले विद्यमान खासदार हे आमचेच आहेत. आमची केंद्रीय नेत्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे.

आपने एका जागेसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसने राज्यातील दोन्ही जागांसाठी दावा करणार असल्याचे वक्तव्य केले होते. राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेस प्रबळ असल्याचे पाटकर यांनी म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भगवंतसिंग मान यांच्यासह गोवा दौरा केला होता. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीसोबत जागा वाटपाची चर्चा सुरु असल्याचे सांगितले होते. दरम्यान, मंगळवारी (दि.13) प्रदेशाध्यक्ष पालेकर यांनी दक्षिण गोव्यासाठी उमेदवाराची घोषणा केली.

दक्षिण गोव्यात सध्या काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन खासदार आहेत, दक्षिणेत भाजप पूर्ण क्षमतेने ताकद लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.

काँग्रेस अथवा भाजपकडून अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आली नसली तरी, दोन्ही पक्ष या जागांवर मोठ्या फरकाने निवडून येण्याचा दावा करत आहेत. भाजपकडून आत्तापर्यंत गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या दोन सभा दक्षिणेतच झाल्या आहेत. त्यामुळे दक्षिणेत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com