Konkani drama competition winner 'Aagale Tu, Vegale Haav' (Goa)
Konkani drama competition winner 'Aagale Tu, Vegale Haav' (Goa)Siddhesh Shirsat / Dainik Gomantak

Goa: कोकणी नाटक स्पर्धेत "आगळें तू वेगळें हांव" प्रथम

उत्कृष्ट दिग्दर्शक समीर गडेकर, सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय मयुरेश गावकर व सर्वोत्कृष्ट महिला अभिनय प्रतिक्षा शिरोडकर
Published on

मडगावच्या 'भांगराळे गोंय अस्मिताय' (Bhangrale Goem Asmitai) संस्थेने आयोजित केलेल्या श्रीमती सुमती रामा नाईक स्मृती निमित्त दुसऱ्या कोकणी नाटक स्पर्धेत (Konkani Natak Competition) मानस, मोयरा येथील राष्ट्रोळी महिला संघाने सादर केलेल्या 'आगळें तू वेगळें हांव ' (Aagale Tu, Vegale Haav) या नाटकाची प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली. मासार्डे येथील महादेव महिला नाट्य मंडळाच्या ' आनंद मठी ' (Anandi Mathi) नाटकाला द्वितिय व साट्रे येथील श्री सातेरी केळबाय बाम्हणी माया संस्थेने सादर केेलेल्या ' दम दमा दम ' (Dam - Dama - Dam) नाटकाला तृतिय पुरस्कार प्राप्त झाला. आंकवार कंपनी (शांतादुर्गा नाट्य मंडळ मासुर्डे, वाळपई) व आगळें तूं वेगळें हांव (श्री रामवडेश्र्वर संस्थान आल्तो पर्वरी) या नाटकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

Konkani drama competition winner 'Aagale Tu, Vegale Haav' (Goa)
'अबकी बार पेट्रोल100 के पार’ कामतांचा भाजपच्या नारेबाजीला चिमटा

इतर वैयक्तिक बक्षिसे ः-

1) दिग्दर्शन - 1) समीर शाबो गडेकर (आगळें तूं वेगळें हांव, राष्ट्रोळी महिला संघ),

2) विनय विष्णू गांवस (आनंद मठी, महादेव महिला नाट्य मंडळ)

2) प्रकाश योजना - उमेश करबटकर (आनंद मठी)

3) पार्श्र्वसंगीत - सुशांत साऴगावकर (आगळें तूं वेगळें हांव)

4) नेपथ्य - कुंदन च्यारी (आनंद मठी)

5) नांदी - जय जय श्री शांतादुर्गे माते (आनंद मठी, श्री सातेरी केळबाय, वाळपई)

6) अभिनय (पुरुष) 1) मयुरेश गावकर (शामरु, दम दमा दम),

2) प्रथमेश गवस (जगदीश, आंकवार कंपनी),

7) अभिनय (महिला) 1) प्रतिक्षा प्रमोद शिरोडकर (कोमल, आगळें तूं वेगळें हांव),

2) रविना रविराज शेट (कल्पना - आगळें तूं वेगळें हांव)

8) उत्कृष्ट विनोदी भुमिका - विठोबा (सलील) गावस (जय, आंकवार कंपनी)

Konkani drama competition winner 'Aagale Tu, Vegale Haav' (Goa)
Goa: दामोदर संगीत विद्यालयात चंद्रनमस्कारद्वारे गुरुला वंदन

या नाट्य स्पर्धेचे परिक्षक म्हणुन श्री. नामदेव शेट, श्री. प्रसाद पागी, श्री. सूरज कोमरपंत यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून पंकज नमशीकर, तर संयोजक म्हणून सूरज कोमरपंत होते. हा निकाल संस्थेचे अध्यक्ष राजेश प्रभु यांंनी जाहीर केला. बक्षिस वितरणाचा कार्यक्रम 8 ऑगस्ट रोजी वेर्णा येथील श्री महालसा देवस्थानच्या अन्नपुर्णा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे प्रमुख पाहुणे व डिजीसॉल कंपनीचे मालक कमलाक्ष नाईक हे सन्माननिय अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com