37th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा बिगुल वाजणार! आज औपचारिक प्रारंभ

पावसाचे सावट; शुभारंभी बॅडमिंटन स्‍पर्धा
37th National Games
37th National GamesDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games: 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा अधिकृत शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्यास आठ दिवसांचा अवधी बाकी आहे; मात्र त्यापूर्वीच गुरुवारपासून (ता. 19) स्पर्धेचा बिगुल ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिममध्ये वाजणार आहे.

ऑलिंपिक तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत उद्‌घाटनापूर्वी काही खेळांचे सामने खेळविण्याची परंपरा आहे. ती आता गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही पाळली जात आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन २६ ऑक्टोबर रोजी होईल; मात्र गुरुवारपासून बॅडमिंटनमधील स्पर्धांना सुरूवात होत आहे.

19 ते 21 ऑक्‍टोबरपर्यंत सांघिक पुरुष व महिला तर नंतर 22 ते 24 पर्यंत पुरुष व महिला गटातील एकेरी व दुहेरी गटातील स्पर्धा होईल. बॅडमिंटन स्पर्धेत देशाचे प्रमुख खेळाडू सहभागी नसले तरी नवोदितांकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्पर्धेचे शिवधनुष्य पेलण्यास गोवा सज्ज होत बनला आहे.

मात्र परतीचा पाऊस कमालीचा लांबल्यामुळे यजमानांचे चेहरे चिंताग्रस्त आहेत. विशेषतः बाह्य मैदानावरील (आऊटडोअर) खेळांना पावसाचा फटका बसू शकतो. येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत ही स्‍पर्धा चालणार आहे.

नोंदणीत गोंधळ

पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने थाटामाटात स्वागत, निवास-भोजनाची चांगली सोय, कडक सुरक्षा आणि सुरक्षितता राखण्यावर भर देण्‍यात आला आहे. मात्र खेळाडू, अधिकारी, पत्रकार आदींची नोंदणी, त्यांची अधिस्वीकृती याबाबत आयोजन समितीत प्रचंड गोंधळ उडाला आहे.

बॅडमिंटन स्पर्धा गुरुवारपासून सुरू होत असली तरी प्रसिद्धीमाध्यमांची, तांत्रिक अधिकाऱ्यांची अधिस्वीकृती पत्रे तयारी झाली नव्हती. ती लवकर तयार होतील अशी अपेक्षा आहे.

37th National Games
Vijai Sardesai: लाचखोरी, भ्रष्टाचार वाढेल! सरकारी नोकरांच्या सॅलरी सर्टिफिकेटबाबतची अधिसूचना मागे घ्या...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com