37th National Games: ‘पेंचाक सिलाट’ मधल्या सुवर्णपदकाचे 'सिक्रेट' काय? करिना म्हणतेय...

37th National Games Goa: करिना शिरोडकरची कामगिरी : राष्ट्रीय स्‍पर्धेत ‘पेंचाक सिलाट’मध्‍ये मारली बाजी
37th National Games Goa
37th National Games GoaDainik Gomantak

37th National Games Goa: करिना शिरोडकर हिने 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ‘पेंचाक सिलाट’ या खेळात सुवर्णपदक जिंकले, जे तिच्यासाठी संस्मरणीय ठरले.

स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच समावेश झालेल्या या खेळातील करिनाचे सोनेरी यश गोव्यासाठीही ऐतिहासिक ठरले. काही महिन्यांपूर्वीच ‘पेंचाक सिलाट’ खेळात दाखल झालेल्या करिनाने भरपेट आणि आवडीचे अतिखाणे टाळले.

सारे लक्ष खेळावर केंद्रित केले आणि त्याद्वारे ती विजेतेपदापर्यंत प्रगती साधू शकली.

करिनाची आई सेबत या खूपच आनंदित होत्या. त्यांनी सांगितले, की ‘करिना फूडी आहे.

मात्र ‘पेंचाक सिलाट’ शिबिरात दाखल झाल्यानंतर राष्‍ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकायचेच या जिद्दीने ती पेटून उठली. आपल्या खाण्याच्या सवयींवर तिने कठोर बंधने आणली.

आहाराच्‍या बाबतीत ती काटेकोर राहिली. करिनाचे वडील राजेश शिरोडकर हे ‘रियल ग्रुप’चे संचालक आहेत.

37th National Games Goa
37th National Games: गोव्यासाठी रविवार शुभवार! तब्बल 28 पदकांची कमाई

कायद्याची पदवीधर: करिना ही कायद्याची पदवीधर आहे. तिची आई पूर्वाश्रमीच्या शिक्षिका व आता वकिली करतात. करिनालाही गुन्हेगारीविषयक वकिली करायची आहे.

त्याचवेळी तिला पोलिस सेवा परीक्षाही खुणावत आहे. ‘करिना पूर्वी तायक्वांदोत खेळायची, राष्ट्रीय पातळीवर गोव्यातर्फे खेळली आहे. विद्यापीठ पातळीवरही तिने सुवर्णपदके जिंकली आहेत.

प्रशिक्षकांचा प्रभाव : करिनाच्या खेळातील यशस्वी कारकिर्दीत प्रशिक्षक सिराज खान यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी तिला खूप प्रोत्साहित केले. त्यामुळेच ती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकली, असे सेबत शिरोडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com