37th National Games: गोव्यासाठी रविवार शुभवार! तब्बल 28 पदकांची कमाई

37th National Games Goa: 1 सुवर्ण, 1 रौप्य, 8 ब्राँझ प्राप्त
37th National Games
37th National GamesDainik Gomantak

37th National Games Goa: यजमान गोव्यासाठी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस पदकविजेता ठरला, शिवाय पदकांची संख्याही वाढली.

पेंचाक सिलाटमध्ये मिरामार येथील 23 वर्षीय वकील करिना शिरोडकर हिने टँडिंग महिला गटात 80-85किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकले. गोव्याचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले.

काही महिन्यांपूर्वीच तायक्वांदोकडून पेंचाक सिलाट खेळात दाखल झालेल्या करिनाचे हे पहिलेच राष्ट्रीय सुवर्णपदक ठरले. या खेळात गोव्याला सर्वाधिक पदके मिळाली आहेत.

संजना प्रभुगावकर हिने 200 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक जिंकले. दुबईत प्रशिक्षण घेणाऱ्या या जलतरणपटूचे हे राष्ट्रीय पातळीवरील हे पहिलेच सीनियर पदक ठरले.

रविवारपासून ॲथलेटिक्स स्पर्धेला सुरवात झाली. त्यात पुरुषांच्या 5000 हजार मीटर शर्यतात अजय कुमार याने ब्राँझपदक जिंकल्यामुळे गोव्याचे ट्रॅक अँड फिल्डवर पदकाचे खाते उघडले गेले.

37th National Games
Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे ताजे भाव

गोवा पेंचाक सिलाट संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी अत्यंत रोमांचित झालो आहे. कोकणीत सांगायचे झाल्यास... म्हाका एकदम भरून येयला... १ सुवर्ण, १ रौप्य व १४ ब्राँझसह एकूण १६ प्रथमच समावेश झालेल्या या खेळात गोव्याला मिळाली आहेत. या कामगिरीचे मुख्य श्रेय आमचे मुख्य प्रशिक्षक अँथनी ब्रागांझा याने जाते. आम्हाला आता गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.’’

डॉ. शेखर साळकर, अध्यक्ष, गोवा पेंचाक सिलाट संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com