Onion Market Price In Goa: कांद्याची 'पन्नाशी' पार; मात्र अभ्यासक म्हणातात की सध्याचे दर...

काही दिवसांपूर्वी मसाल्याच्या साहित्यासह लिंबू, टोमॅटो या भाज्यांच्या दरांनी उच्चांक गाठला होता.
Onion Market Price In Goa
Onion Market Price In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Onion Market Price In Goa सध्या बाजारपेठेत भाज्यांचे दर काहीसे स्थिर असले तरी मागील आठवडाभरात कांद्याने मात्र 'पन्नाशी' गाठली. राज्यासह लगतच्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा उत्पादकांनी कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला नाही.

परिणामी कांदा 50 रु किलो दराने विकला जात आहे. बाजारात तुटवडा निर्माण झाल्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी मसाल्याच्या साहित्यासह लिंबू, टोमॅटो या भाज्यांच्या दरांनी उच्चांक गाठला होता. टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते.

अशा परिस्थितीत दसरा, दिवाळी यांसारखे महत्त्वपूर्ण सण तोंडावर असतानाच कांद्याने पन्नाशी गाठल्याने सर्वसामान्य जनतेत निराशा पसरलेली होती. मात्र आता कांद्याच्या बाबतीत जी दरवाढ झाली आहे ती पुढील काही दिवासात मूळ पदावर येण्याची शक्यता कृषी तज्ञानी व्यक्त केली आहे.

सध्या तळ कोकणासह राज्याच्या ग्रामीण भागात भात कापणीला सुरुवात झाली असून ढगाळ हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

तसेच पुढील काही दिवसांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली असून पाऊस पडल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाणार आहे.

Onion Market Price In Goa
Cuncolim Industrial Estate: दुर्गंधी, वायु प्रदूषण, सांडपाणी! कुंकळ्ळीतील समस्यांचे ग्रहण सुटेना; ग्रामस्थ आक्रमक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com