Goa : २९३० पायलट सुविधांविना

Goa : ‘कोरोना’ महामारीत पर्यटकांअभावी धंदा बुडाला, आता इंधनदरवाढीचा फटका
Goa : Motorcycle Piolot in Goa
Goa : Motorcycle Piolot in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गेल्‍या दीड वर्षांहून अधिक काळ कोरोना (Covid-19) महामारीमुळे पर्यटकांअभावी व्‍यवसाय बुडाला, आता इंधनाचे भाव वाढल्‍याने पायलट (Motorcycle Piolot) व्यवसाय घाट्यातच चालला आहे. त्यात सरकारकडून कोणत्‍याही सुविधा उपलब्ध नाहीत. राज्यात सुमारे ३ हजार २०० पायलट आहेत. त्यापैकी केवळ २७० जणांना शासकीय सुविधा मिळतात, बाकीचे सुविधांपासून वंचित असल्‍याची माहिती मोटारसायकल पायलट संघटनेचे माजी सचिव सुरेश वेरेकर यांनी दिली.

Goa : Motorcycle Piolot in Goa
Goa Politics: कोण 'बाहेरचे' आणि कोण 'आतले' हे सांगेकरच ठरवतील; सावित्री कवळेकर

मोटारसायकल पायलटांवर कोविड काळात जणू संकट कोसळले आहे. पर्यटक नाहीत, त्यामुळे धंदा होत नाही. दुसरीकडे इंधनाचे दर आभाळाला भिडले आहेत. सरकार आम्हाला मदत करण्याचे आश्‍वासन देत आहे, पण त्याची पूर्तता कधी होणार? असा प्रश्‍न पायलट हिरालाल गोवेकर यांनी उपस्थित केला.

कदंब बसस्‍थानकावर हवी स्‍वतंत्र जागा
शहरातील कदंब बसस्थानकावर पायलटांसाठी स्वतंत्र व्‍यवस्था आहे. पण, त्या ठिकाणी आता परप्रांतीयांचे अतिक्रमण वाढत आहे. येत्या काळात आम्हाला वाहने थांबविण्यासाठी तरी जागा असेल का? असा प्रश्‍न पायलटांनी उपस्थित केला. कदंब बसस्थानकावर सुमारे ५० हून अधिक पायलट असल्याचे वेरेकर यांनी सांगितले. दुचाकी उन्हात थांबवाव्या लागतात. आम्हालाही उन्हात थांबावे लागते. अनेकजण विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. पण, कुणीच आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत.

पायलटांच्‍या समस्‍यांसंदर्भात सरकारकडून केवळ आश्‍वासनांचा पाऊस पडतो, प्रत्यक्षात काहीच होत नाही. पायलटांच्या समस्‍यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. ५० वर्षे पूर्ण झालेल्या पायलटांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो. सध्या केवळ २७० पायलटांनाच शासकीय सुविधांचा लाभ होतो, बाकीच्यांना सुविधा कधी मिळणार?
- सुरेश ठाकूर, पायलट संघटनेचे अध्यक्ष.

रिक्षा चालकाही संकटात
जी स्थिती मोटारसायकल पायलटांची आहे, तशीच स्‍थिती रिक्षा चालकांचीही आहे. कोविडचा सर्वांनाच फटका बसला आहे. जुने गोवेसाठी जायला पूर्वी २५० रूपये भाडे मिळायचे, आता १०० ते १५० मिळणे अवघड झाल्याचे रिक्षा चालक शब्बीर सय्यद यांनी सांगितले. ३० वर्षांपासून हा व्यवसाय करतो, पण अशी स्थिती कधीच उद्‍भवली नव्हती. कोविडमुळे संसार उध्वस्त व्हायची वेळ आली आहे. सरकारने आम्हाला विशेष अनुदान द्यावे, असे जमीर अहमद बोळेकर म्हणाले.

बसस्थानकांवर परप्रांतीयांचे अतिक्रमण
शहरातील कदंब बसस्थानकावरील खुल्या जागांवर परप्रांतीय अतिक्रमण करीत आहेत. कदंब प्रशासनाचेही त्‍याकडे दुर्लक्ष झाले आहे. अशाप्रकारे खुल्या जागा गिळंकृत केल्या जात असल्याने भविष्यात स्थानिक पायलट, रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांची गोची होणार असल्याचे वेरेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com