Goa: दवर्ली दिकरपाल पंचायतीवर निधी मालवणकर यांची बिनविरोध निवड

या बदलाने ही पंचायत आता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजपच्या दक्षिण गोवा कार्यकारिणीचे सरचिटणीस सत्यविजय नाईक यांनी केला आहे.
दवर्ली दिकरपाल पंचायतीच्यासरपंच  म्हणून निधी मालवणकर तर उपसरपंच म्हणून परेश नाईक यांची आज बिनविरोध निवड  झाली.
दवर्ली दिकरपाल पंचायतीच्यासरपंच म्हणून निधी मालवणकर तर उपसरपंच म्हणून परेश नाईक यांची आज बिनविरोध निवड झाली. Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सासष्टी तालुक्यातील महत्वाच्या पंचायतींपैकी एक असलेल्या दवर्ली दिकरपाल पंचायतीच्या (Dikarpal Panchayat) सरपंच (Sarpanch) म्हणून निधी मालवणकर (Nidhi Malvankar) तर उपसरपंच म्हणून परेश नाईक यांची आज बिनविरोध निवड झाली. या बदलाने ही पंचायत आता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजपच्या दक्षिण गोवा कार्यकारिणीचे सरचिटणीस सत्यविजय नाईक यांनी केला आहे.

दवर्ली दिकरपाल पंचायतीच्यासरपंच  म्हणून निधी मालवणकर तर उपसरपंच म्हणून परेश नाईक यांची आज बिनविरोध निवड  झाली.
Goa Election: गोवा फॉरवर्ड काँग्रेसशी युती करणार

यापूर्वी या पंचायतीच्या सरपंच सिया वरक आणि उपसरपंच म्हणून हेरकुलान नियासो हे होते. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून त्यांचा 6-5 मतांनी पराभव केल्यामुळे रिक्त झालेली ही पदे भरून काढण्यासाठी ही निवडणूक झाली होती. या नव निर्वाचित सरपंच ,उप सरपंचाचे नाईक यांनी नंतर फुलांचे गुच्छ भेटवून अभिनंदन केले.

दरम्यान मालवणकर आणि नाईक यांचे भाजपचे जिल्हा पंचयत सदस्य उल्हास तुयेकर यांनीही अभिनंदन केले असून यावेळी त्यांच्या बरोबर नावेलीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष मधूकला शिरोडकर व एससी मोर्चाचे उपाध्यक्ष विद्याधर आर्लेकर हे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com