Goa: भुईपाल विद्यालयातील 25 टक्के विद्यार्थी नॉट रिचेबल

भुईपाल सरकारी माध्यमिक विद्यालयात या संबंधी जाणून घेण्यासाठी भेट दिली असता, मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस यांनी दिलेल्या माहितीवरून समजले.
Bhuipal Vidyalaya
Bhuipal VidyalayaDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: सद्या सर्वत्र विद्यार्थ्यांना नेटवर्कची समस्या जाणवत आहे, त्यामुळे या कोरोना काळात सर्वात जास्त फटका बसला तो म्हणजे शैक्षणिक क्षेत्राला, गेल्या वर्षी पासून विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यालय यांचे नाते दुरावत चालले आहे, परंतू शिक्षण खात्याच्या आदेशानुसार शिक्षकांना विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिकवणी करावी लागत आहे, पण सदर शिकवणी करताना नेटवर्क समस्येमुळे सर्वच विद्यार्थ्यां पर्यंत शिक्षक पोचू शकत नसल्याचे भुईपाल सरकारी माध्यमिक विद्यालयात (Bhuipal Vidyalaya) या संबंधी जाणुन घेण्यासाठी भेट दिली असता, मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस (Rosy Miniseries) यांनी दिलेल्या माहितीवरून समजले.

Bhuipal Vidyalaya
Goa: सत्तरीत पर्यायी व्यवस्था केली, ती ही धोकादायक

पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल गावात असलेल्या या सरकारी माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या वर्गात एकुण 112 विद्यार्थी आहेत, यामध्ये सालेली, भुईपाल धनगरवाडा, भेडशेवाडा, डोबवाडा, गावकरवाडा या भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोव्हीड 19 माहामारीच्या निर्बंधांमुळे सद्या त्यांचे ऑनलाईन वर्ग घेतले जात आहेत, परंतू ऑनलाईन वर्ग घेताना सुमारे 25 टक्के विद्यार्थ्यांना नेटवर्क तसेच मोबाईलची समस्या असल्याने त्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना नोट्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून शिकवले जात असल्याचे मुख्यध्यापिका रोझी मिनेजिस हीने सांगितले. सदर विद्यार्थ्यां मधून सालेली भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नेटवर्कची समस्या जास्त भेडसावत असल्याचे शेवटी तिने स्पष्ट केले.

सदर विद्यालयात मुख्याध्यापक धरून 10 कायम स्वरुपी शिक्षक तसेच तासिका तत्त्वावर आधारित दोन शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत आहेत, त्यामुळे शिक्षकांची समस्या नाही असे मिनेजिस हीने सांगितले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी नेटवर्कची समस्या जाणवत असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परीणाम होण्याची जास्त शक्यता आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्ग घेऊन शिक्षण देणे हे महत्त्वाचे असे मत पालक वर्गा कडून व्यक्त केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com